अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात पेटवुन घेतलेल्या तरुणाचे निधन

अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात पेटवुन घेतलेल्या तरुणाचे निधन
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात पेटवून घेतलेल्या राहुरीच्या तरुणाचे उपचारादरम्यान निधन राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथील ऋषिकेश विठ्ठल ढव्हाण (रा. बाभुळगाव, ता.राहुरी) या तरुणाने अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात त्याच्या विरुद्ध खोटा गुन्हा नोंदविला गेल्याचे सांगून त्या तरुणाने स्वतःला पेटून घेतल्याची घटना 18 मे रोजी घडली होती. ऋषिकेश याच्यावर त्यांच्याच गावातील थोरात कुटुंबीयांने शेतीच्या वादातून खोटे गुन्हे दाखल केल्याने व त्याला मारहाण केल्याने ऋषिकेशला याचा मानसिक त्रास सहन न झाल्याने ऋषिकेशने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते.
तसेच काही दिवसांपूर्वी ऋषिकेशने याने सोशल मीडियावर याची एक व्हिडिओ क्लिप तयार करून आपण पेटवून घेणार असल्याचे कळविले होते. परंतु जिल्हा न्यायालयाच्या आवारात ऋषिकेश ढव्हान या तरुणाने 18 मे रोजी स्वतःला अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात पेटून घेतले होते. त्यानंतर भिंगार कॅम्प, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व ऋषिकेश याला उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु ऋषिकेश हा 75 % भाजल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. परंतु ऋषिकेश याने तीन दिवस मृत्यूशी झुंज दिली परंतु जास्त प्रमाणात भाजल्यामुळे त्याची प्राणज्योत आज 21 मे 2022 रोजी पुणे येथील सह्याद्री मालवली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.