संस्थेच्या विकासाच्या नावाखाली स्वःहीत साधण्याचे महापाप सत्ताधांऱ्यांनी केले असुन आता खोटे नाटे चालणार नाही -शरद नवले

संस्थेच्या विकासाच्या नावाखाली स्वःहीत साधण्याचे महापाप सत्ताधांऱ्यांनी केले असुन आता खोटे नाटे चालणार नाही –शरद नवले
बेलापूरः(प्रतिनिधी )-बेलापूर सोसायटीचे विद्यमान सत्ताधारी खोटं बोलं पण रेटून बोल ह्या गोबेल्स नितीत पारंगत आहेत.संस्थेच्या विकासाच्या गोंडस नावाखाली स्वंः हित साधण्याचे काम केले असुन त्यांचे पितळ उघडे पडले आहे.त्यामुळेच या निवडणुकीत सत्तापरिवर्तन आणि गावकरी मंडळाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केला आहे. जि प सदस्य शरद.नवले पुढे म्हणाले की,सत्ताधा-यांचे कारनामे सभासदांच्या लक्षात आले आहे.त्याच त्याच नेत्यांना आणि त्याच त्या चेहऱ्यांचा सभासदांना वीट आला आहे.जेथे तेथे ठराविक नेत्यांचीच टोळीच दिसत आहे . पदे फक्त यांनाच हवी असतात.सामान्य कार्यकर्त्यांना फक्त स्वार्थापुरते वापरायचे आणि स्वार्थ साधून झाला की वा-यावर सोडायचे हि यांची रित आहे.आता माञ सभासदांना बदल हवा आहे आणि तो होणारच यात शंका नसल्याचे .नवले म्हणाले. यांच्या ताब्यात पंधरा वर्षे ग्रामपंचायत होती.तेथे यांनी काय प्रताप केले हे जनतेला ठाऊक आहे.एका माजी सरपंचावर अपाञ होण्याची नामुष्की आली.अनेक प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागले.जे ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते ते कारभार हाकीत होते.
कोणाची बिले काढायची,कोणत्या चेकवर सह्या करायच्या याबाबत सूचना देत होते.ग्रामपंचायत ही रिमोट नेत्याच्या मर्जीने चालत असल्यामुळे अनेक गैरप्राकार झाले ..तोच प्रकार सोसायटीतही चालत होता.चेअरमन नामाधारी सयाजीराव तर रिमोट नेता बाजीराव अशी अवस्था होती.पेट्रोल पंपावरुन कोणाला पेट्रोल व डीझेल उधारीवर दिले गेले आणि कोणाकोणाकडून वसूली केली गेली हे सभासदांना माहित आहे.जुना पेट्रोल पंप व आता नुतनीकरण केलेल्या पेट्रोल पंपाचे फोटो टाकून टिमकी वाजविली जात आहे पण यात सत्ताधा-यांची कर्तबगारी काय?हि नुतनीकरण कामे विक्रीच्या प्रमाणात आॕईल कंपनी करते.पेट्रोल आणि डीझेलची घट हि प्रमाणीत घटीपेक्षा अधिक आहे.तसेच टेस्टिंगच्या नावाखाली आठवेळा ७६८ लिटर पेट्रोल काढले गेले.याची परस्पर विक्री झाली की कसे. तसे शेरेही कंपनी सेल्स अधिका-यांनी वार्षिक समरी अहवाल व मासिक विक्री पुस्तकात मारले आहेत.
यावरुन यातही काळेबेरे असल्याचेच स्पष्ट होत आहे.तसेच पेट्रोलची अपेक्षित विक्री एक लाख लिटरने तर डीझेलची अपेक्षित विक्री दोन लाख लिटरने कमी झाली आहे हे चांगल्या कारभाराचे लक्षण आहे का? पेट्रोल पंपात नफा झाल्याच बडेजाव केला जातो. पण पूर्वी पेट्रोलला प्रतिलिटर ७५पैसे कमिशन होते.ते आता प्रतिलिटर ३रुपये २५पैसे तर डिझेलला पूर्वी प्रतीलिटर ४०पैसे कमिशन होते.तर आता प्रतिलिटर २रुपये २५पैसे मिळत आहे.कंपनीने कमिशनमध्ये घसघशीत वाढ केल्याने नफा दिसतोय.यात संचालक मंडळाची कर्तबगारी काय?तेव्हा खोटीनाटी माहिती देवून दिशाभूल करु नये असे श्री.नवले म्हणाले. सोसायटी हि सभासदांच्या अर्थकारणाशी निगडीत आहे याचे भान सत्ताधा-यांना नाही.त्यांनी स्वतःचेच हित साधले आहे.संस्थेत गफले करुन सत्ताधारी मालामाल झाले आहे.हाच माल आता निवडणुकीत बाहेर पडणार आहे.सत्ताधा-यांना सत्तेची व पैशाची धुंदी आहे.पण सभासद उद्याच्या निडणुकीत हि धुंदी उतरविल्याशिवाय राहाणार नाहित.गावकरी मंडळाने गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीत पारदर्शक कारभार केला आहे.विकासाची अनेक कामे अल्पावधीत केली आहे.लोकाभिमुख कारभार करुन जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे.तसाच सभासदाभिमुख कारभार सोसायटीतही केला जाईल.यासाठी गावकरी मंडळाला विजयी करावे असे आवाहनही नवले यांनी केले आहे.