नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल ह. भ. प. संगिताताई शेजूळ महाराज यांचे स्वागत.

नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल ह. भ. प. संगिताताई शेजूळ महाराज यांचे स्वागत.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील ह. भ. प. संगिताताई शेजूळ महाराज यांनी नर्मदा परिक्रमा पायी पुर्ण केल्याबद्दल त्यांचे टाकळीभान ग्रामस्थ, भाविकभक्त व विठ्ठल रूख्मिणी मंदिर देवस्थान यांचे वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला.
आज दिनांक ६ रोजी सकाळी ८ वाजता संगिताताई शेजूळ यांचे टाकळीभान येथे आगमन झाल्यावर बस स्थानक जवळील कमानी पासून ते श्री. विठ्ठल मंदिर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत भजनी मंडळ, भाविक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आल्यावर संगिताताई शेजूळ महाराज यांचा ग्रामस्थ, भाविक, विठ्ठल देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलतांना संगिताताई शेजूळ यांनी नर्मदा परिक्रमा बाबत अनुभव सांगून एकदातरी जीवनात नर्मदा परिक्रमा करावी असे आवाहन त्यांनी केले.
संगिताताई शेजूळ यांची नर्मदा परिक्रमा नोव्हेंबर महिन्यात सुरू झाली होती ती तीन महिने सुरू होती.जवळजवळ त्यांनी ३६०० कि मी पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पुर्ण केली. श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी नर्मदा आरती करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे तालूका प्रमुख दादासाहेब कोकणे, लहानभाऊ नाईक, रोहिदास पटारे, गोकुळ भालेराव, सुरेश बनकर, लहानभाऊ पवार, प्रकाश काळे, दिलीप पवार, अशोक शेळके, बाबासाहेब पवार साहेबराव बोडखे, एकनाथ बोडखे, पटारे, भानुदास नवले, लक्ष्मण भालसिंग, बंडू बोडखे, दत्तात्रय पटारे रामनाथ पंडीत, मच्छिंद्र पंडीत, नानासाहेब लेलकर, गंगाधर गायकवाड, भाऊ कोकणे तसेच लिलाबाई लेलकर, सुमन मुळे, शालीनी बनकर अर्चना पवार, जमुना गायकवाड, वैशाली देवळालकर आदी महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळीभान— येथील ह. भ. प. संगिताताई शेजूळ महाराज यांनी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या बद्दल
त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, भाविकभक्त.