गायरान जमिनीवरील कार्यवाही थांबवावी, गोरगरिबांना दिलासा द्यावा या करता लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना निवेदन

गायरान जमिनीवरील कार्यवाही थांबवावी, गोरगरिबांना दिलासा द्यावा या करता लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना निवेदन
गायरान जमिनीवरील कार्यवाही थांबवावी, गोरगरिबांना दिलासा द्यावा या करता ,टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे लोकनेते भानुदास मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले,
सरकारी गायरान जमिनीवर अनेक दलित, आदिवासी, भटके विमुक्त, भूमीहीन, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी जनतेने या गायरान जमिनीवर घरे उभे केली व त्या जमिनीमध्ये पिके घेऊन व स्वतःची उपजीविका भागवत आहेत. तसेच सरकारी जागेवर निवासी प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमण धारक महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या मिळालेल्या घरकुलाचाही उपभोग घेत आहेत. सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी कोणतेही ठोस साधन नाही, तसेच सरकारी जागेवर घर बांधून राहत असलेल्या परिवारांना ही या जागे व्यतिरिक्त राहण्यासाठी कोणतीही जागा नाही. महाराष्ट्रातील शेती प्रयोजनासाठी जमीन विहित केलेली गायरान धारक आणि सरकारी जागेवर घरे बांधून राहत असलेले निवासी भोगवटादार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे निवेदन देण्यात आले.
या अतिक्रमण धारक जनतेने ऊस तोडून, वीटभट्टी कामावर जाऊन मोलमजुरी करून कुटुंबाला निवारा मिळावा म्हणून परिस्थितीनुसार निवारा उभा केला आहे, तो मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार पाडण्यात येणार आहेत असे अतिक्रमण लाभधारक जनतेस प्रशासनाकडून नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण गायरान लाभधारक जनता चिंतेत पडली आहे. हि जनता रात्रंदिवस विचार करू लागली आहे. माता-भगिनींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आहे. कोणी जेवण बंद केले आहे, असा धसका जनतेला बसला आहे.
महाराष्ट्र सरकारने या अतिक्रमणधारकांच्या बाजूने रिट पिटीशन याचीका सुप्रीम कोर्टात दाखल करावी व हे अतिक्रमण काढू नये अशी आपणास नम्र विनंती असे निवेदन लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनावर ज्ञानदेव साळुंके, शिवाजी शिंदे, मयुर पटारे, दत्तात्रय नाईक, दत्तात्रय मगर, यशवंत रणनवरे, सुनील बोडखे, शंकर पवार, रावसाहेब वाघुले, भाऊसाहेब पटारे, दत्तात्रय पटारे, बाळासाहेब आहेर, उत्तम पवार, रमेश पटारे, संजय रणनवरे, गणेश पवार, मल्हार रणनवरे, संजय पटारे, भागवत रणनवरे, शिवाजी पवार, जालिंदर शेळके, शिवाजी पटारे यांच्या सह्या आहेत.
-अतिक्रमण काढू नये याकरता ग्रामपंचायत मासिक सभेचा ठराव करून, सरकार दरबारी पाठवण्यात येईल,-मयूर पटारे, ग्रामपंचायत सदस्य