आरोग्य व शिक्षण

प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव आरोग्य विषयी विशेष मोहीम राबवत विद्यार्थ्यास केले मार्गदर्शन

प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव आरोग्य विषयी विशेष मोहीम राबवत विद्यार्थ्यास केले मार्गदर्शन

 

टाकळीभान प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगांव यांच्या वतीने डॉ, उन्मेश लोंढे, यांच्या टीमने आरोग्य विषयी विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यु इंग्लिश स्कूल माळवाडगांव विद्यार्थी विद्यार्थिनींना आरोग्य विषयी जागरूकता कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात आले.

      प्राथमिक आरोग्य केंद्र माळवडगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश लोंढे व डॉ. पांडुरंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आरोग्य पथकाने न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडगाव येथे भेट देत. विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी जागरूकता कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले पावसाळ्यात उद्भभवणाऱ्या विविध आरोग्य विषयी समस्या कीटकजन्य, जलजन्य व हवेमार्फत पसरणाऱ्या विविध आजाराबाबत माहिती देऊन त्यांची लक्षणे, कालावधी, रोगप्रसार,औषधोपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच डासअळी,गप्पी मासे व वैयक्तिक हात धुण्याची योग्य पद्धत यांचे प्रात्यक्षिक दाखवून आरोग्य शिक्षण देण्यात आले.

सध्या पावसाळी दिवस असल्याने व डास वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने किटकजन्य आजार जसे मलेरिया, डेंगू, चिकूनगुणिया, झिका, मेंदूज्वर इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते. सदर आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घराच्या अवतीभवती साचलेली लहानमोठी पाण्याची डबकी बुजवावीत किंवा वाहती करून द्यावीत किंवा त्यात काळे ऑइल टाकावे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, शौचालयाच्या व्हेंट पाईपला कापड किंवा जाळी बसवावी, योग्य घनकचरा व्यवस्थापन करावे, डासांचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस म्हणून अवश्य पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

जलजन्य आजार जसे कॉलरा, टाइफाईड,कावीळ, डायरिया, गॅस्ट्रो* इत्यादी टाळण्यासाठी रोजचे पिण्याचे पाणी उकळून गाळून प्यावे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, जेवणापूर्वी व स्वयंपाकापूर्वी हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवावेत, नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी.

  सकस आहार ताज्या पालेभाज्या फलो आहार घेऊन आपली प्रतिकार शक्ती वाढवावी असे आवाहन आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांना करण्यात आले. आरोग्य पथकामध्ये प्राथमिक आरोग्य.केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पांढरे एस. एच., आरोग्य निरीक्षक कोठुळे आर. एल., आरोग्य सहाय्यीका श्रीमती पटारे एम.यू. आरोग्य सेवक साव पी. व्ही., पटारे एम.डी. शितल त्रिभुवन, तसेच आशा स्वयंसेविका अर्चना आसने व राजश्री गायकवाड हे आरोग्य कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी , आदी उपस्थित होते न्यू ईग्लिश स्कूल च्या वतीने उंडे ,व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सुनील पाचपिंड यांनी आभार मानले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे