पावसामुळे दुरावस्था झालेल्या भाजी मंडईची नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून घेतली काळजी*

*पावसामुळे दुरावस्था झालेल्या भाजी मंडईची नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून घेतली काळजी*
महाराष्ट्रभर पावसाची सुरुवात झाली आहे. आळंदी नगरपरिषद येथील नगर परिषदेने बसवलेल्या भाजी मंडई मध्ये संततधार पावसामुळे चिखल आणि राडाराडा झाला होता. आळंदीतील सर्वच नागरिक भाजी घेण्यासाठी या भाजी मंडई मध्ये एकत्रित येत असतात. पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झालेल्या आणि भाजी घेण्यासाठी नागरिकांची असलेली गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात आळंदीकर नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती. या बाबीकडे मात्र सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झालेले दिसले. एरवी निवेदन देऊन या ना त्या अशा विविध कामासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना विनंती केली जाते. परंतु भाजी मंडईत झालेली दुरावस्था नागरिकांना चालता येत नाही विशेष करून महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात याकडेही सर्वच समाजसेवा करणाऱ्या पक्ष आणि पुढारी यांना विसर पडलेला दिसला. विशेषतः महिला, वयस्कर महिला,लहान मुले यांची वर्दळ भाजी मंडई मध्ये भाजी घेण्यासाठी सातत्याने असते. ही बाब आळंदी नगरपरिषद चे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे लक्षात आली. आणि त्यांनी कुठल्याही निवेदन आणि मागणीची वाट न पाहता जाड प्रकारची खडी टाकत रोलर फिरवून चिखलाचे भक्कम रस्त्यात रूपांतर केले.भाजी मंडईचा चिखल राडाराडा दुरावस्था चालता ही न येण्याची परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली. याबाबत आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे विशेष कौतुक करावे लागेल. कारण इतर वेळेस मात्र नगरपरिषदेला निवेदन देऊन कामे सुचवावी लागतात. मात्र आपली कार्यक्षमता ओळखत. मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी महिला अबाल वृद्ध याना होणारा त्रास आणि रोजच भाजी घेण्यासाठी येणारे नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणातली खडी टाकून भक्कम रस्त्यासारखी स्थिती भाजी मंडईतील राडाराडा चिखल झालेल्या ठिकाणी करून घेतली. तसे विशेष सूचना ठेकेदारांना देऊन स्वतः कामाची पाहणी केली. आता पाऊस कितीहि प्रमाणात झाला.तरी मात्र त्याबाबत कसली तक्रार राहणार नाही अशी सोय आळंदी भाजी मंडईमध्ये झाल्याचे दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात चिखल राडाराडा घाण हे दिसून येत नाही आणि याच विशेष श्रेय आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना जात आहे.