प.मरिया जन्मापासूनच निष्कंलक — लुड्स डँनियल लाखो भावीकांनी घेतले मतमाउलीचे दर्शन

प.मरिया जन्मापासूनच निष्कंलक — लुड्स डँनियल
लाखो भावीकांनी घेतले मतमाउलीचे दर्शन
टाकळीभान प्रतिनिधी- पवित्र मरिया जन्मापासून निष्कंलक होती , म्हणूनच देवाची आई होण्याचा मान तीला मिळाला .देव पवित्र आहे तेव्हा त्याची आई देखील पवित्र आहे . असा संदेश नाशिक कँथोलिक धर्मप्रांताचे महागुरु डाँ.लुड्स डँनियल यांनी मतमाउली यात्रे निमित्तानं उपस्थीत लाखो भाविकानां दिला.
७४ वा यात्रोत्सव निमित्ताने महाराष्ट्रातुन लाखो भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत साडेतीन लाख भावीकांनी मतमाउलीचे दर्शन घेतले. फा.पीटर डीसुझा , फा.मायकल वाघमारे फा.राजू शेळके , फा.आँल्वीन , फा.संतान राँड्रिक्स , फा.जेम्स थोरात , फा.सिमोन शिनगारे , फा.जाँन दिवे , फा.जाँन गुलदेवकर सह ५० धर्मगुरु मिस्सा बलीदानमध्ये सहभागी झाले होते. ट
सकाळी प.मरियेची विशेष भक्ती होऊन प्रमुख धर्मगुरु फा.सुरेश साठे फा.डाँमनिक ,फा.रिर्चर्ड व फा.सचीन यांच्या हस्ते मुकुट अर्पण करुन विधीवत यात्रेची सुरुवात करण्यात आली.
आ.लहु कानडे , मा.आ.चंद्रशेखर कदम ,मा.नगराध्यक्षा व साईबाबा संस्थानचे विश्वस्थ अनुराधा आदिक , माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे , साईबाबा संस्थानचे विश्वस्थ सचीन गुजर प्रांताधिकारी अनिल पवार , तहसिलदार प्रशांत पाटील , मंडलअधिकारी वायखिंडे, तलाठी हेंमत डहाळे , ग्रामसेवक वावीकर आदी यावेळी उपस्थीत होते.मध्यरात्री डिवायएसपी मिटके व सहकारी यांनी मतमाउलीचे दर्शन घेतले.हरेगाव व परीसरातील हजारो भावीकांनी वाजत गाजत येत आपले नवस पूर्ण केले.नाशिक , पुणे , अहमदनगर , औरंगाबाद जिल्ह्यातुन भाविक पदयात्रेने मतमाउली दर्शानाला आले होते.प्रांताधिकारी , तहसिलदार , पोलीस प्रशासन , श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन , श्रीरामपूर नगरपरिषचे मुख्याध्याकारी , पंचायत समिती श्रीरामपूर , उंदिरगाव – हरेगाव ग्रांमपचायत , आशाकुंर संस्था भोकरच्या सि. प्रिस्का व सहकारी , चर्च सलग्न संघटना आदीनी यात्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .