टाकळीभान येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

टाकळीभान येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी
टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हातात खराटा घेऊन स्वच्छतेचा संदेश समस्त मानवजातीला देणारे, अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी, परंपरा यांच्या जाचातून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाचे अमूल्य कार्य करणारे कर्मयोगी, थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालय येथे संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गावातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे ,प्रगतशील शेतकरी शंकरराव पवार, ग्राम. सदस्य मयूर पटारे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, लोकसेवा विकास आघाडीचे उपाध्यक्ष रावसाहेब नाना वाघुले, संजय रणनवरे ,बाळासाहेब आहेर, जनार्दन रणनवरे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.