शिंगवेतुकाई एम आय डी सी तिल हॉटेल मातोश्री लाॅजींग विरुध्द सोनई पोलीस स्टेशनची कारवाई..

शिंगवेतुकाई एम आय डी सी तिल हॉटेल मातोश्री लाॅजींग विरुध्द सोनई पोलीस स्टेशनची कारवाई..
नेवासा तालुक्यातील घोडेगाव जवळील शिंगवे तुकाई येथील एम आय डी सी येथील हाॅटेल मातोश्री वर सोनई पोलीसांनी छापेमारी करत चार परप्रांतीय मुलींची सुटका केली. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार , मा. राकेश ओला साहेब पोलीस अधिक्षक अहमदनगर ,मा. . सुनिल पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव भाग, शेवगाव यांना कुंटनखाण्यावर कारवाई बाबत विशेष मोहीमेचे आयोजन करुन कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते.मिळालेल्या गुप्त माहिती नुसार सोनई पोलीसांनी अहमदनगर ते छत्रपती संभाजी नगर हायवे रोडवरील शिंगवे तुकाई येथील एम आय डी सी. येथे हाॅटेल मातोश्री वर महेश गवळी व सुरज आल्हाट हे दोघे महीला कडुन कुंटनखाना चालवुन पैसे कमवत असल्या बाबत गुप्त माहिती नुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकत चार परप्रांतीय मुलींची सुटका करत हाॅटेल च्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रलोभन दाखवुन त्यांच्याकडुन अनैतिक व्यवसाय करुन घेतला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द सोनई पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४५७/२०२३ स्त्रीयां व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहे., सपोनि. माणिक चौधरी, सफौ. काकासाहेब राख, पोना. तुपे, चालक पोना. वजीर शेख, मपोकॉ. संगिता हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शेवगाव भाग, शेवगाव येथील पोना. बाळासाहेब नागरगोजे, पोकाँ. इलग व दोन पंचासह शिंगवेतुकाई परीसरांतील हॉटेल मातोश्री लॉजिगवर छापा टाकला असता सदर मातोश्री लॉजिगच्या रुममध्ये ४ पिडीत स्त्रीयां व कस्टमर तसेच अनैतिक व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य निरोध पाकीट मिळुन आले. त्यांचेकडे चौकशी केली असता इसम नामे 1) महेश शिवाजी गवळी वय २५ ववर्षे रा. कांगोणी ता. नेवासा 2) सुरज बापु आल्हाट वय २७ वर्षे रा.घोडेगाव ता.नेवासा हा महिलाकडुन वैश्यां व्यवसाय चालवुन पैसे कमवितो. असे सांगितले असता त्यांस पथकांने ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधिक्षक मा.श्रीमती.स्वाती भोर मँडम, श्रीरामपुर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव भाग, शेवगाव यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि. डोईफोडे सो नेवासा पो.स्टे, सपोनि. माणिक चौधरी, सफौ.काकासाहेब राख,पोना. तुपे, चालक पोना. वजीर शेख, मपोकाँ.संगिता हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शेवगाव भाग, शेवगाव येथील पोना. बाळासाहेब नागरगोजे, पोका इलग यांनी केली.