गुन्हेगारी
राहुरी- चाकूचा धाक दाखवून पंचवीस हजार रुपये लुटले.

राहुरी- चाकूचा धाक दाखवून पंचवीस हजार रुपये लुटले.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील महेश सुरेश घोरपडे हे राहुरी वरून टाकळीमिया कडे जात असताना लघुशंकेसाठी थांबले असता त्या ठिकाणी आरोपी यांनी येऊन फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून तुझ्या खिशात पैसे आहेत हे आम्हाला माहीत आहे असे सांगून ते पैसे काढून दे नाहीतर तुला चाकूने ठार मारीन असे म्हणत फिर्यादीच्या खिशातून पंचवीस हजार रुपये पाचशे रुपयाच्या पन्नास नोटा काढून घेऊन फिर्यादीला ढकलून देऊन विना नंबरच्या काळ्या रंगाची बॉक्सर गाडीवर पळून गेले आहेत. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे आरोपी पिंटू उर्फ सुरेंद्र विजय सांगळे व एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध भादवि कलम392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय नाऱ्हेडा हे करीत आहे.