महाराष्ट्र
विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा टाकळीभान येथे.

विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा टाकळीभान येथे सत्कार.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे लोकसेवा विकास आघाडी व मयूर पटारे युवा मंच तसेच ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात निवड झालेल्या व उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा नूकताच सन्मान करण्यात आला.
टाकळीभान येथील सेवा निवृत्त अधिकारी, पोलीस दल तसेच विविध क्षेत्रात निवडी झालेले मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी नितिन पटारे, राहुल जाधव, गणेश पटारे, प्रमोद रणनवरे, महेश बडाख, सुभाष पटारे, अर्जून राऊत, विजय शेंडे, तुषार दाभाडे, शिवाजी नवले, हिराबाई साळूंके, अर्चना पवार, यशवंत रणनवरे, भाऊसाहेब बनकर आदींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच अर्चना रणनवरे, अशोकचे माजी संचालक लक्ष्मण (भाऊ) थोरात, माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळूंके, लोकसेवा विकास आघाडीचे शिवाजीराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे, सुनिल बोडखे, दिपक पवार, संदीप जावळे, अशोकचे संचालक यशवंत(आप्पा)रणनवरे, संचालिका हिराबाई साळूंके, अर्चना पवार रयतचे जनरल बाॅडी सदस्य बापूसाहेब पटारे, माजी संचालक दत्तात्रय नाईक, रावसाहेब मगर, रावसाहेब वाघुले, भाऊसाहेब कोकणे, पिनू कोकणे, शिवाजी पवार, एकनाथ लेलकर, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष आबासाहेब रणनवरे, सतीश रणनवरे, अनिल दाभाडे, देवा कोकणे, सुभाष पटारे, शिवाजी पटारे, बद्री पटारे, देवा पाबळे, दिगंबर मगर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप जावळे यांनी तर आभार मयूर पटारे यांनी मानले.