हेलपाटे मारून दमलेल्या वयोवृद्धाला दहा मिनिटात रेशन कार्ड तयार करून दिले//तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दाखवली आपल्या कामाची चुणूक

हेलपाटे मारून दमलेल्या वयोवृद्धाला दहा मिनिटात रेशन कार्ड तयार करून दिले//तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दाखवली आपल्या कामाची चुणूक
सर्व सामान्याच्या मदतीला शिवसेना
राहुरी फॉक्टरी येथील बाबांच वय अंदाजे ८३ वर्ष वयाच्या आसपास आहे. त्यांचे नाव श्री.वसंतराव गणपत पटारे रा.राहुरी कारखाना ता.राहुरी येथिल रहिवाशी आहेत.श्री.पटारे काका हे राहुरी येथिल तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आहेत.श्री.पटारे काका व त्यांची पत्नी असे दोघेच राहुरी कारखाना येथे वास्तव्यास आहेत.
श्री.पटारे काका हे गेल्या अनेक दिवसान पासून रेशन कार्ड मिळविण्यासाठी राहुरी कारखाना ते राहुरी तहसील येथे फेऱ्या मारत होते.प्रत्येक वेळी तहसील कार्यालयात पुरवठा विभागातील लोक नवीन कारण देवून कामात दिरंगायी करत होते.
श्री.पटारे काका यांचे वय झालेले असल्यामुळे सतत तहसील कचेरी राहुरी येथे फेऱ्या मारणे असह्य झाले होते. श्री.पटारे काका यांनी शिवसेनेचे ता.संघटक अशोक तनपुरे यांना रेशन कार्ड संदर्भाची अडचण सांगितली, श्री.अशोक तनपुरे यांनी तात्काळ शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांना सर्व घटना फोन करून सांगितली.
तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी तात्काळ श्री.पटारे काका यांना सोबत घेत राहुरी येथे नव्याने रुजू झालेले तहसीलदार श्री.चंद्रजित राजपूत यांच्या समोर सर्व परिस्थित मांडली…. तहसीलदार श्री.राजपूत यांनी तात्काळ पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेत _”भारताला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष झालेत…. इतक्या वर्षानंतर देखील वयोवृद्धांना रेशनकार्ड साठी फेऱ्या माराव्या लागतात…. तात्काळ रेशनकार्ड तयार करा मी स्वाक्षरी करतो…”_ असे फर्मान सोडले….
पुढच्या दहामिनिटात श्री.पटारे काका यांना रेशन कार्ड मिळाले.
रेशन कार्ड मिळाल्याचा आनंद श्री.वसंतराव पटारे काका यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
संवेदनशील तसीलदार श्री.चंद्रजित राजपूत यांच्या कार्यतत्परते मुळे वयोवृद्ध श्री.पटारे काका समाधानाने परतले.
राहुरी तालुक्यात कोणत्याही पदावरील अधिकाऱ्याने कार्यतत्पर पणे काम केल्यास नागरिक सन्मानच करतात आणि एखाद्या अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर केल्यास धिक्कार पण करतात हा राहुरी करांचा इतिहास आहे.
राहुरीत नव्याने आलेले तहसीलदार श्री.चंद्रजित राजपूत हे राहुरी तालुक्यात धडाकेबाज काम करतील असे दिसत आहे.