खर्चाला फाटा देऊन वाढदिवसानिमित्त केले सफाई कामगारांना स्वच्छता किट चे वाटप…

खर्चाला फाटा देऊन वाढदिवसानिमित्त केले सफाई कामगारांना स्वच्छता किट चे वाटप…
टाकळीभान प्रतिनिधी: येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राऊत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ग्रामपंचायत सफाई कामगारांना स्वच्छता किट चे वाटप केले. गावातील घाण साफ सफाई करणारे स्वच्छता दूत आपल्या आरोग्याचा धोका पत्करून स्वच्छतेचे महत्त्वाचे काम करत असतात. आजच्या काळात विविध आजारांच्या प्रादुर्भाव वाढत असताना हे स्वच्छतादूत समाजासाठी मोठे काम करत आहे.त्याबद्दल सफाई कामगारांना स्वच्छता किती वाटप करण्यात आले. स्वच्छता किटमध्ये पर्यावरण प्रदूषण निवारण स्वच्छता दूत टी-शर्ट, मास्क, स्याने टायझर, हात मोजे, टोपी आदी साहित्य भेट देण्यात आले, यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, माळोदे मामा आप्पासाहेब वाघुले, रावसाहेब आहेर, दिगंबर मगर, जितेंद्र छल्लारे, गजानन कोकणे, विष्णुपंत पटारे, नवनाथ पवार, मधुकर गायकवाड , सोमनाथ पवार, काका डिके,तुषार दाभाडे, महेश शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक बनकर, सुनील रणनवरे, मिलिंद शेळके, मच्छिंद्र शिंदे ,बाबासाहेब गाडे ,संभाजी बर्डे, विमल माळी ,ललिता गव्हाणे आदींसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.