गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका पक्षाचा कार्यकर्ता गावठी कट्ट्यासह श्रीरामपूर पोलिसांच्या जाळ्यात

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका पक्षाचा कार्यकर्ता गावठी कट्ट्यासह श्रीरामपूर पोलिसांच्या जाळ्यात
श्रीरामपूर शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एका पक्षाच्या पदाधिकारी गावठी कट्ट्या सह पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. झाले असे की श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की वार्ड नंबर सात येथील जय भोले हॉटेल शेजारी पृथ्वी ढाबा समोर एक इसम गावठी कट्ट्यासह मिळून येईल. त्यानुसार पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सूचना दिल्यावरून पीएसआय सोळुंके व त्यांच्या टीमने सदर ठिकाणी गेले असता एक इसम संशयितरित्या आढळल्याने त्यांनी त्याला त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव महेश राम करण विश्वकर्मा वय 36 वर्षे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ विनापरवाना गावठी कट्टा सिल्वर पांढऱ्या रंगाच्या काळ्या प्लॅस्टिक हॅन्ड grip वर स्टार कोरलेला गावठी कट्टा मिळून आला. त्याचवेळी त्याला ताब्यात गावठी कट्ट्या सह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 899/ 2024 अधिनियम कलम भारतीय हत्यार कायदा 3, 25 बी एन एस नुसार गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली . पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोना/ रघुवीर कारखेले, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/रामेश्वर तारडे, पोकॉ/ आजीनाथ आंधळे, मपोकॉ/ मिरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर, पोना/ सचिन धनाड, पोना/वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.