सण उत्सव साजरे करताना कुणाच्या भावना दुखवू नका – DYSP शिवपुजे

सण उत्सव साजरे करताना कुणाच्या भावना दुखवू नका – DYSP शिवपुजे
बेलापुर (प्रतिनिधी )-आपले सण उत्सव साजरे करताना कुणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या मिरवणूकीत काही गैरप्रकार होवु नये याची खबरदारी घ्या .गैरप्रकार करणारावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी दिला. बेलापुर पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते या वेळी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके जाफरभाई आतार मोहसीन सय्यद उपस्थित होते .या वेळी बोलताना श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की प्रत्येकाने आपले सण उत्सव शिस्तीत व संयमाने शांततेत साजरे करुन आपल्या सणाचे पावित्र्य जपावे दुसऱ्याच्या धर्माचा आदर करुन आपला सण आनंदात साजरा करा पण कायदा मोडून कुणी वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असा सज्जड दमही त्यांनी भरला .
या वेळी जि प सदस्य शरद नवले साभापती सुधीर नवले खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके उपसभापती अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई नितीन शर्मा राहुल माळवदे मोहसिन सय्यद यांनी गणेश विसर्जन मिरवणूक व इद ऐ मिलाद या कार्यक्रमाविषयी सुचना मांडल्या .या वेळी बेलापुरच्या सरपंच स्वाती अमोलीक अशोक गवते दिलीप दायमा अजीज शेख मुस्ताक शेख मुनीर बागवान पोलीस पाटील अशोक प्रधान ,युवराज जोशी उमेश बारहाते ,जीना शेख ,अली शेख आसीफ शेख जब्बार आतार मोसीम शेख मोईन शेख नसीर शेख शफीक बागवान हवालदार बाळासाहेब कोळपे ,संपत बडे ,भारत तमनर, ज्ञानेश्वर वाघमोडे ,नंदकुमार लोखंडे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी पोलीस उपनिरीक्षक सुहास हापसे यांनी आभार मानले