बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या शुभहस्ते प्रभू वैद्यनाथ रुद्राभिषेक

बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या शुभहस्ते प्रभू वैद्यनाथ रुद्राभिषेक
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्र यात्रेनिमित्त दि.18 फेब्रुवारी 2023 रोजी परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथ रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, आयुक्त विश्वास सोपानराव मुंडे, प्राचार्य भास्कर सोपानराव मुंडे, न्यायाधीश आनंद सोपानराव मुंडे, नारायण फड, शोभाताई आनंदराव मुंडे, सविता भास्कर मुंडे, सुनंदा नारायण फड, वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, नायब तहसीलदार बी. एल. रुपनर तलाठी विष्णू गिते यांची उपस्थिती होती.बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त बीड जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी तथा कन्हेरवाडी च्या सून दीपा मुधोळ- मुंडे यांच्या शुभहस्ते प्रभू वैद्यनाथास सहकुटुंब रुद्राभिषेक करण्यात आला.