श्री दुर्गामाता दौडमुळे बेलापूरातील वातावरण बनले भक्तीमय

श्री दुर्गामाता दौडमुळे बेलापूरातील वातावरण बनले भक्तीमय
राष्ट्रीय नवरात्रौ उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापुर विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौड २०२२चे आयोजन करण्यात आले असुन या दुर्गामाता दौडमुळे गावाचे वातावरण भक्तिमय झाले आहे . दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापुर विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडेपाच वाजता सर्व युवक युवती गावातील शनि मंदिरासमोर एकत्र होतात श्री छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला अभिवादन करुन गावातील प्रत्येक गल्लीतुन ही फेरी जात असते वेगवेगळी पद्य गात जागो हिंदु जागो अशी हाक देत ही दौड जनजागृती करत आहे गावातील महीला देखील या दौडचे भक्तीभावाने स्वागत करत आहे महीला आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढुन ध्वजाचे पुजन करुन तरुणांचा उत्साह वाढवत आहेत देव देश धर्म ही भावना जागृत ठेवुन माता तुळजाभवानी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशिर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी प पू गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतुन तरुण पिढीला व्यसनापासुन दुर करणे समाजात लव्ह जिहादचे प्रमाण वाढत आहे जबरदस्तीने धर्मांतराचे करण्याचे प्रकार वाढत आहे, त्याकरीता जनजागृती करणे हिंदु संघटन करणे नागरीकात आपापसात प्रेमभाव निर्माण करणे हे मुख्य कार्य डोळ्यासमोर ठेवुन श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान बेलापुर विभाग कार्य करत आहे , गावातुन फेरी पुर्ण झाल्यानंतर देविच्या मंदिरात आरती करुन दौडची सांगता होते .