सारंगधर महाराजांचा आजपासून यात्रोत्सव

सारंगधर महाराजांचा आजपासून यात्रोत्सव
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील जागृत देवस्थान व येथील ग्रामदैवत श्री सारंगधर महाराजांची यात्रा मंगळवार दिनांक 12 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे
मुळा नदी काठावर असलेल्या या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक गर्दी करतात मध्यंतरी कोरोनाच्या काळात प्रशासनाने काही निर्बंध लावले असल्याकारणाने गावकऱ्यांनी यात्रा स्थगित ठेवली होती परंतु आता कोरोना परिस्थिती संपले असल्याकारणाने तसेच शासनाने निर्बंध हटवल्याने गावकऱ्यांनी एकजुटीने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून त्यानिमित्ताने येथे ग्रामस्थांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी सारंगधर महाराजांना गंगा दिकाने कावडीने आणलेल्या पाण्याने स्नान घातल्यानंतर हा यात्रोत्सव सुरू होईल त्याच दिवशी संध्याकाळी छबिना आयोजित करण्यात आलेला असून छबीना च्या निमित्ताने शोभेच्या दारूची आतिषबाजी मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रात्री तमाशा करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी कुस्त्यांचा हंगामा असून तालुक्याच्या इतर ठिकाणाहून नाही मल्ल हजेरी लावतात
या ग्रामदेवता बाबत अनेक आख्यायिका गावांमधील जुने जाणते लोक सांगतात सारंगधर महाराज हे वंशाने गोसावी असल्याने या ठिकाणी ते दारोदार माधुकरी मागत उदरनिर्वाह करीत असत येथील वास्तव्यात त्यांनी देवादिकांची भक्ती करून उदरनिर्वाह चालविला परंतु गावातील काही लोकांनी या दैवतांची परीक्षा पाहण्याचे ठरवले या परीक्षेत सारंगधर महाराजांनी आपली प्रचिती दाखवून लोकांना चकित केले त्यानंतर सारंगधर महाराजांनी गावात आपले प्रस्ताव मांडून भक्ती कार्य सुरू केले भक्तीमार्ग सांगून लोकांना संकटातून मुक्त केली
सारंगधर महाराजांच्या काळात औरंगाबादेत मुगल सम्राट औरंगजेब यांची सत्ता होती या काळात लोक औरंगजेबास भेटण्यासाठी गावांमधून जात असत या गावातून काही लोक मुगल सम्राट भेटून आले परंतु सारंगधर महाराज भेटण्यासाठी आले नाही याचा राग मुगल सम्राट आस आल्याने औरंगजेब बादशहाने महाराजांना कैद करण्यासाठी सेना पाठवली सैनिकांनी महाराजांना सम्राटाचा आदेश सांगितला त्यांनी औरंगाबादला जाण्यास स्पष्ट नकार दिला त्यावेळी स्वतः औरंगजेब बादशहा या गावी महाराजांना भेटण्यास आला त्यावेळी मुगल सेना बरोबर असणारे हजारो सेवक नोकरचाकर त्यांच्या जेवणाची सोय औरंगजेब बादशहास करण्यास अवघड जाणार होते परंतु महाराजांनी जमीन खाणण्यास सांगितले जमीन खणल्या नंतर त्या ठिकाणी स्वयंपाकाच्या कढया भांडी आदी वस्तू चमत्कार स्वरूपात निघाल्या वस्तू पाहिल्यानंतर बादशहा चकित झाला तरीही परीक्षा पहायची म्हणून बादशहाने खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचे फर्मविले महाराजांनी हा आदेश त्वरित अमलात आणला व कढाया भांडी विविध पदार्थांनी भरू लागल्या हा चमत्कार बादशहाने पाहिल्याने चकित झाला व महाराजांची माफी मागितली तसेच अंगावरील मोस आल्यास येथे पाच शनिवार करून महाराजांना मिठा पिठाचा पुड्या वाहिल्यास रुग्ण बरा होऊन जातो अशा अनेक बाबीनी महाराजांनी आपले स्थान निर्माण करून समाज जागृती घडवून आणली
या विविध अख्यायिकामुळे या दैवतास दरवर्षी हजारो भाविक दर्शनास येत असतात याहीवेळी भाविकांनी येथे यात्रेस हजेरी लावून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे व सरपंच सौ सविता कोळपे यांनी केले आहे