पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची-प्राचार्या कोकाटे

पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची-प्राचार्या कोकाटे
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी ठेवून पर्यावरणाचे संवर्धन करावे असे अवाहन बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी काढले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला .त्या वेळी बोलताना प्राचार्या डाँक्टर कोकाटे म्हणाल्या की,”माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी” हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू झाला. ओडीसा राज्यातील कोणार्क मंदिरावरील सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकावर आधारित आहे .रथ हे गतीचे प्रतीक आहे.समाजात परिवर्तन करण्याची ताकद तरुणांमधे आहे.आपतकालीन परिस्थितीत मग तो भुकंप असेल,महापूर असतील. यात काम करुन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नेहमीच योगदान दिले आहे.गावात पर्यावरण जागृती करणे, स्वच्छता करणे, तंटामुक्ती करणे, शारीरिक मदत करणे, गावात व्यायामशाळा,ग्रंथालय ,वाचनालय,
शैक्षणिकशाळा,क्रिडांगणे ,कुस्तीशाळा गावतळे,शेततळे,बंधारे उभारण्यात राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले गाव आदर्श गाव करावे असेही त्या म्हणाल्या तर डॉ. बाबासाहेब पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्व विकास होतो.श्रमाचे महत्त्व समजते.बौद्धिक व्याख्याने ऐकून ज्ञान मिळते.आयुष्याचा अर्थ समजतो.विद्यार्थ्यांचे ओरिएनटेशन करताना प्रा.रुपाली उंडे म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी आपल्यातली विविध कौशल्ये आत्मसात करावीत.शिस्त शिकावी.स्वत:चे संरक्षण कसे करायचे हे शिकावे,स्वावलंबी जीवन शिकावे .कष्टाची केव्हाच लाज बाळगु नये असे केले तर आपण कधीच उपाशी राहणार नाही असे सांगितले.कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर व प्रा.रुपाली उंडे यांनी केले तर डॉ.बाबासाहेब पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानले.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.