आत्मनिर्भर भारतासाठी ज्ञानाधारित समाजरचना आवश्यक – कुलगुरू प्रो. डॉ. आर. सर्राजू

आत्मनिर्भर भारतासाठी ज्ञानाधारित समाजरचना आवश्यक – कुलगुरू प्रो. डॉ. आर. सर्राजू
जुनी शिक्षण पद्धती रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त नव्हती. परंतु नवीन शैक्षणिक धोरणामुळे निश्चितच आशादायी बदल घडतील असे वाटते. डिजिटल युगात शिक्षणामुळे व्यावसायिक गुणवत्ता वाढ आणि विकास झाली पाहिजे. वर्तमानकालीन गरजा लक्षात घेऊनच अभ्यासक्रम ठरवणे गरजेचे आहे. आत्मनिर्भर भारतासाठी ज्ञानाधारित समाजरचना आवश्यक असल्याचे मतप्रतिपादन हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. आर. एस. सर्राजू यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय भाषा समिति, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार व हिंदी विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय भाषाओं के परिप्रेक्ष्य मे व्यवसायिक एवं विकास शिक्षा :चुनौतिया एवं संभावनाऍ’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषक म्हणून प्रोफेसर डॉ. सर्राजू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा मा. सौ.शालिनीताई विखे पाटील होत्या.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी केले. याप्रसंगी दिल्ली येथील तकनिकी शब्दावली आयोग पूर्व निदेशक डॉ. उमाकांत खुबालकर, बिहार दरभंगा येथील डॉ. रश्मी शर्मा, भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय शैक्षणिक समन्वय डॉ. चंदन श्रीवास्तव, सातारा महाविद्यालयाचे हिंदी विभागाध्यक्ष डॉ. शिवाजी चवरे, अहमदनगर महाविद्यालयाचे प्रो. डॉ. साताप्पा चव्हाण, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष मा. श्री. विश्वासराव कडू पाटील, संस्थेच्या शैक्षणिक विभागाचे संचालक व प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, राहाता येथील एस. एस. आर.आई. कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. महेश खर्डे, उपप्रचार्य प्रो. डॉ. दीपक घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष भाषणात मा. ना. सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, भारतीय भाषांचे अध्ययन करत असताना बहुभाषिकता, नाविन्यता, क्रियाशीलता, व्यावसायिकता आणि सर्वसमावेशकता ही तिची बलस्थाने असल्याचे आढळून येते. मातृभाषेत अध्ययन-अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना सोप्या भाषेत समजतील. विद्यार्थी आविष्कार प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चितच राष्ट्र विकास साध्य होईल.
कार्यक्रमाचे समन्वयक व हिंदी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. भाऊसाहेब नवले यांनी चर्चासत्राची पार्श्वभूमी सांगितली. आभार उपप्रचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. दीप्ती आगरकर व डॉ. अनंत केदारे यांनी केले.