बेलापुरात एक पणती शहीदो के नाम उपक्रम संपन्न

बेलापुरात एक पणती शहीदो के नाम उपक्रम संपन्न
देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवान व शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रध्दांजली वहाण्याचा तसेच भारतीय जवान व पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी एक पणती जवानांसाठी हा उपक्रम फ्रेंडस् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात आला.फ्रेंड़्स फाँर एव्हर गृप व समस्त ग्रामस्थांच्या वतीने देशाचे रक्षण करताना जे जवान शहीद झाले तसेच आपले कर्तव्य बजावताना जे पोलीस बांधव शहीद झाले त्यांना श्रध्दांजली वहाण्यासाठी तसेच भारतीय जवान व कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी गेल्या नऊ वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजता हा उपक्रम राबविण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व भारत मातेचे पुजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात असलेल्या ध्वजस्तंभाभोवती हजारो पणत्या माजी सैनिक तसेच पोलीस बांधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते प्रज्वलीत करण्यात आल्या या वेळी शहीद जवान शहीद पोलीस बांधव आत्महत्या केलेले शेतकरी बांधव या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली या वेळी शहीद जवान अमर रहे जय जवान जय किसान वंदे मात़़्रम भारत माता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या या वेळी माजी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई,रणजित श्रीगोड,मारुती राशिनकर,विष्णूपंत डावरे दिलीप दायमा,दिपक क्षत्रिय, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, अजीज शेख,भीमराज हुडे,ग्रामपंचायत सदस्य,मुस्ताक शेख तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद, शिवाजी वाबळे,लहानु नागले, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे हरिष पानसंबळ पोलीस पाटील अशोक प्रधान कैलास चायल,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा,रावसाहेब अमोलीक बाबुलाल पठाण,शफीक बागवान सुधीर तेलोरे,महेश कुऱ्हे, गणेश बंगाळ,दत्तात्रय मुसमाडे,रफिक शेख,जयेश अमोलीक,गयाज पठाण,वैभव कुऱ्हे,योगेश दायमा पोपट नवले, समीर जहागीरदार, जब्बार पठाण,सुरेश सूर्यवंशी, अवधूत कुलकर्णी, जयेश अमोलिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी फ्रेंड़्स फाँर एव्हर गृपचे विष्णूकांत लखोटीया, शशिकांत तेलोरे,राजेश सुर्यवंशी वेणूगोपाल सोमाणी,अभिषेक खंडागळे,सुमित सोमाणी विशाल वर्मा,मयुर साळूंके,सुभाष शेलार योगेश जाधव, संदीप जाधव ऋतुराज नाईक, विजय कोठारी प्रभात कुऱ्हे निशीकांत लखोटीया,रविंद्र कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ आदिनी विशेष प्रयत्न केले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार व्यक्त केले.