आरोग्य व शिक्षण

उत्तर प्रदेश शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींची धानोरे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट*

*उत्तर प्रदेश शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींची धानोरे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट*

आज दिनांक 3 मे 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता उत्तरप्रदेश सरकारच्या सर्व शिक्षा योजनेतील शिक्षण विभागातील SCERT चे प्रमुख डॉ.पवनकुमार यांचे नेतृत्वात SCERT उत्तरप्रदेशच्या कमिटीने आमच्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे,तालुका-खेड, पुणे. या शाळेला भेट दिली.
सध्या उत्तरप्रदेश सरकार च्या SCERT ची टीम महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. राज्यात राबविले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम, त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणारा अनुकूल परिणाम, महाराष्ट्र सरकारच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या माध्यमातून चालू असणारे शैक्षणिक प्रयोग व त्याची परिणाम कारकता याचा अभ्यास करून उत्तरप्रदेश सरकारच्या शैक्षणिक धोरणात करावयाच्या सुधारणा ही समिती सुचविणार आहे.
सदरच्या समितीमध्ये
1) डॉ. पवन कुमार, संयुक्त निदेशक (सर्व शिक्षा अभियान), SCERT उत्तर प्रदेश.
2) श्रीमती दीपा तिवारी, उप शिक्षा निदेशक, SCERT उत्तर प्रदेश.
3) श्री संतोष कुमार उपाध्याय,सहायक उप शिक्षा निदेशक,SCERT उत्तर प्रदेश.
4) सुश्री प्राची वर्मा, वित्त -लेखाधिकारी, SCERT उत्तर प्रदेश
5) सुश्री मीनाक्षी राय, प्रवक्ता SCERT उत्तर प्रदेश
6) डॉ. प्रसून कुमार सिंह, प्रवक्ता SCERT
उत्तर प्रदेश
7) विजय दहिफळे विषयतज्ञ् SCERT पुणे. यांचा समावेश होता.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. सत्यवान लोखंडे, श्री. पांडुरंग आव्हाड सह शिक्षक त्याचप्रमाणे धानोरे ग्रामपंचायत चे सरपंच श्री. अनिल गावडे, शाळा व्यवस्थापण समिती सदस्य व मा. सरपंच श्री. विठ्ठल गावडे यावेळी उपस्थित होते. राज्यशासनाच्या विविध योजना शाळा स्तरावर कशा राबविल्या जातात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना काय आहे. त्याची अंमलबजावणी कशी होते. भौतिक सुविधाच्या पूर्ततेबरोबरच शैक्षणिक उपक्रम राबवून शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी साधली जाते. विविध स्वयंसेवी संस्थांचा शिक्षण प्रक्रियेत कसा उपयोग करून घेतला जातो.याची सविस्तर माहिती घेतली.
शाळेतील भौतिक सुविधा, विज्ञान व गणित प्रयोगशाळा, संगणक कक्ष, इ लर्निंग सुविधा, टॅब, प्रोजेक्टर यांच्या मदतीने केले जाणारे परिणामकारक अध्यापन या विषयी चर्चा केली. वर्षभरात शाळेत राबविले गेलेले उपक्रम, विविध स्पर्धामधील शाळेची सर्वोत्कृष्ट कामगिरी, NMMS व स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षा मधील यशाचा चढता आलेख, गुणवत्तेबरोबरच कला क्रीडा, नाट्य, संगीत, वक्तृत्व क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळा व ग्रामपंचायत करत असलेल्या प्रयत्नाची समितीकडून प्रशंसा करण्यात आली.
शाळा व ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच श्री अनिल गावडे यांनी समिती प्रमुख डॉ. पवन कुमार, संयुक्त निदेशक (सर्व शिक्षा अभियान), SCERT उत्तर प्रदेश.व इतर सहकारी यांचा शाल व पुस्तक भेट देवून सन्मान करण्यात आला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे