राजकिय
वांगी बुद्रुक ग्रामपंचायत लाक्षणिक निकाल, सर्वच नवीन चेहऱ्यांना संधी

वांगी बुद्रुक ग्रामपंचायत लाक्षणिक निकाल, सर्वच नवीन चेहऱ्यांना संधी.
श्रीरामपूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून वांगी खुर्द व कमलपुर ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाल्या.
तसेच वांगी बुद्रुक खंडाळा उंबरगाव व माळेवाडी या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात वांगी बुद्रुक नावाजलेली ग्रामपंचायत निकाल लागलेला आहे.
त्यात सरपंच पदासाठी ज्ञानेश्वर सोपान बिडगर हे विजयी झाले असून इतर 7 सदस्य निवडून आलेले आहेत सर्वच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे सर्व ठिकाणाहून निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचा सत्कार होत असून, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.