कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी थम प्रक्रियेचा शुभारंभ

कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी थम प्रक्रियेचा शुभारंभ
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात आले असून अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी थम प्रक्रियेचा शुभारंभ आज अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शाखा टाकळीभान येथे करण्यात आला आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सप्टेंबर २०१९ पर्यत थकीत असलेली दोन लाख रूपयांपर्यतची कर्ज रक्कम माफ करण्यात आलेली आहे मात्र प्रामाणिक कर्ज भरणार्या शेतकर्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे शासनाकडून नियमित कर्ज फेड करणार्यांना शेतकर्यांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे टाकळीभान शाखाधिकारी पराग ढुमणे, कॅशिअर नारायण जगताप, शिपाई दत्तात्रय सामोसे, पांडूरंग कुदळ, उपसरपंच कान्हा
खंडागळे, भारत भवार, प्रा. जयकर मगर, किशोर पटारे, संत सावता माळी सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दाभाडे बाबासाहेब लोखंडे, सचिव रामनाथ ब्राम्हणे, रामनाथ पटारे, रामभाऊ हुळहुळे, मोहन रणनवरे, गोरख बनकर भारत भवार, बाबासाहेब घनकर,आदी उपस्थित होते.