माजी महापौरांचे चर्मकार समाजाविषयी अपशब्द चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र शाखा श्रीरामपूर वतीने निषेध .

माजी महापौरांचे चर्मकार समाजाविषयी अपशब्द चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र शाखा श्रीरामपूर वतीने निषेध .
29 जानेवारी 2022 रोजी नागपूर चे माजी महापौर संदीप जोशी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेज च्या माध्यमातून चर्मकार व इतर समाजाविषयी जातीवाचक तसेच अश्लील शब्दांचा वापर करून फेसबुक पोस्ट टाकल्याने संपूर्ण राज्यभरातून या घटनेचा निषेध नोंदवला जात असताना, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने नागपूर येथील संघटनेचा निषेधार्थ ,तहसीलदार प्रशांत पाटील, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर, पोलीस कार्यालय ग्रामीण श्रीरामपूर ,तसेच प्रांत कार्यालय श्रीरामपूर, यांना निवेदन देऊन माजी महापौर संदीप जोशी यांनी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करून, चर्मकार समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावली गेलेली असून जोशी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी चर्मकार संघर्ष समितीचे जिल्हा संघटक दिलीप शेंडे यांनी केली आहे.
तसेच संबंधित समाजकंटकावर कारवाई न झाल्यास संघर्ष चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील शेंडे यांनी दिला आहे .सदरच्या आंदोलनास श्रीरामपूर ग्रामीण अध्यक्ष श्री संजय दळवी, शहराध्यक्ष श्री कर्णासाहेब कापसे,महिला शहराध्यक्षा सौ. इंदू नन्नवरे तसेच श्री संतोष भाऊसाहेब देवराये उपाध्यक्ष, श्री रवींद्र सदानंद गाडेकर संघटक, श्री राहुल भाऊसाहेब कापसे खजिनदार,श्री बाळासाहेब बापूराव चव्हाण सहसचिव,श्रीअशोक रामभाऊ खैरे संघटक ,श्री नामदेव गंगाराम नन्नवरे सल्लागार,श्री नामदेव बाळूभाऊ कानडे खजिनदार, सौ भाग्यश्री कर्णासाहेब कापसे सचिव ,सौ भारती सचिन कांबळे सहसचिव,सौ सुनंदा दिलीप शेंडे संघटक,सौ मोहिनी अशोक खैरे सल्लागार,सौ सोनल प्रेमचंद वाघमारे सल्लागार,श्री सतीश विठ्ठल शेंडे कार्याध्यक्ष आदींसह चर्मकार संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.