आधारवेल फाऊंडेशन कडून चिंचाळे येथील आदिवासी कुटुंबाला मिळाला मदतीचा आधार

आधारवेल फाऊंडेशन कडून चिंचाळे येथील आदिवासी कुटुंबाला मिळाला मदतीचा आधार
*राहूरी तालुक्यातील चिंचाळे येथील ठाकरवाडी येथे एका आदिवासी कुटुंबाच्या राहत्या घराला आग लागून त्यात एक वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला असून दोन लहान मुले थोडक्यात बचावले आहे.आगीत सर्व संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने सदर कुटुंब हे उघड्यावर पडले*.
*सदर घटनेची माहिती मिळताच आधारवेल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व जिल्हा नियोजन समितीच्या मा.सदस्या मा.वैशालीताई नान्नोर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळची पाहणी केली व घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून अशी वाईट वेळ कुणावरही येऊ नये , काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे अस सांगत नान्नोर यांनी सदर कुटुंबाला धीर दिला.आणि तात्काळ आधारवेल फाऊंडेशनच्या वतीने सदर कुटुंबाला किराणा ,धान्य,भांडी संसारपयोगी वस्तू देत नान्नोर यांनी मदतीचा आधार दिला* .
*उघड्यावर पडलेल्या या गरीब कुटुंबाला मदतीची अत्यंत गरज होती. नान्नोर यांच्याकडून मदत मिळताच सदर कुटुंबाचे अश्रू अनावर झाले व केलेल्या मदतीसाठी त्यांनी नान्नोर यांचे आभार मानले.तसेच या कुटुंबाला शासनाकडून लवकरात लवकर घरकुल व आणखी मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यापुढे देखील आपले सामाजिक कार्य आधारवेल फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरिबांना मदत करण्यासाठी कायम चालू राहील असे सौ.नान्नोर यांनी यावेळी सांगितले*
*यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष (भ.वि.जा.) व आधारवेलचे सदस्य प्रा.संजय तमनर,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कोळसे,बाबासाहेब वडीतके,कैलास हाके,भगवान काळे,संदीप ढाकणे ,प्रतीक सिंग,आदी उपस्थितीत होते*..
*आधारवेल फाऊंडेशन च्या माध्यमातून वैशालीताई नान्नोर यांनी गोरगरिब ,गरजू निराधार विधवा महिला,गरजू शालेय विध्यार्थी, आत्महत्या शेतकरी कुटुंबाना मदत करण्यासाठी व शासनाच्या योजना गरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी जे जे विविध सामाजिक उपक्रम राबवले व गोरगरिबांना मदत केली त्याचे तालुक्यातील गोरगरीब जनतेतून मोठया प्रमाणात कौतुक होत आहे*.