संपादकीय
पत्रकार भवनासाठी जागा मिळावी. पत्रकारांची ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे मागणी.

पत्रकार भवनासाठी जागा मिळावी. पत्रकारांची ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे मागणी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पत्रकारांनी पत्रकार भवनासाठी
जागा मिळावी या मागणीचे निवेदन सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत टाकळीभान यांना देण्यात आले आहे.
पत्रकार संघ व पत्रकार सेवा संस्था टाकळीभान यांचे वतीने आज पत्रकार भवनासाठी जागा मिळावी या मागणीचे निवेदन उपसरपंच कान्हा खंडागळे व ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पत्रकार भवनासाठी जागा नाही त्यामुळे येथील
श्री. संत सावता महाराज मंदिरा जवळ व स्वाध्याय परिवाराच्या रोड जवळील गट २५०/१ ही सहान जागा पत्रकार भवनासाठी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, चंद्रकांत लांडगे, विजय देवळालकर, बापूसाहेब कोकणे, अशोक रणनवरे,संदिप बोडखे, रामेश्वर आरगडे, बापूसाहेब नवले,मोहन जगताप, सुरेश पवार, सुरेश वाघुले, कारभारी जाधव, अनिता तडके, अर्जुन राऊत उपस्थित होते.