महाड-वाकी, गावठण येथे सोमेश्वर महादेव मंदिरा मध्ये महाशिवरात्री महोत्सव भक्तिभावाने साजरा*

*महाड-वाकी, गावठण येथे सोमेश्वर महादेव मंदिरा मध्ये महाशिवरात्री महोत्सव भक्तिभावाने साजरा*
सदगुंरुच्या आदेशाने व गुरुतत्वसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर महादेव मंदिर, ता. महाड-जि. रायगड, वाकी बु. गावठण येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने महाअभिषेक महाप्रसाद,अन्नदान करण्यात आले व दिवस भर सेवेची तयारी करुन शिवपिडींवर महाअभिषेक व महादेवाला त्यांच्या आवडीची बेलपत्र वाहुन शिवपुजन करण्यात आले. होम हवन तसेच श्री.शिवलीला अमृत कथासार 11 वा अध्यायाचे वाचन श्री. क्षेत्र गावठण महिला व मुलींचा हरिपाठ, हळदीकुंकू सभारंभ करण्यातआले, रात्री भैरवनाथ महीला भजन मंडळ कुंभारवाडा (बिरवाडी) गायिका सौ.अमृता ताई पवार. यांचे सुंदर भजन झाले तसेच महाशिवरात्री महोत्सवला वाकी पंचक्रोशीतील नामवंत व्यक्ती व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावठण ग्रामस्थ तसेच गावठण महिला मंडळ, नवतरुण क्रिडा मंडळ, गावठण मुंबई मंडळ यांनी सोमेश्वर महाशिवरात्री निमित्त खुप मोलाचे सहकार्य केले. महाशिवरात्री महोत्सवाला सुत्रलोचन श्री. संदिप विश्राम कदम.यांनी केले. आणि सोमेश्वर महादेव मंदिराकडुन आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळकृष्ण दादाजी म्हामुणकर. यांनी करुन कार्यक्रमाचा समारोप केला.