खळबळजनक राहुरीत गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना
गावठी कट्टा आणि राहुरी, देवळाली प्रवराचे कनेक्शन काय?

राहुरीत गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना.
राहुरी नगर पालिकेच्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर गावठी कट्ट्यातून हातावर गोळी झाडल्याची घटना घडल्या नंतर गोळी झाडणाऱ्या आरोपींनी ताब्यात घेताना मोठ्या प्रमाणात शस्ञ साठ्यासह घातक शस्ञ निर्माण करण्याचे साहित्य पोलिसांना सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.त्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक डाँ.बी.जी.शेखर पाटील यांनी रविवारी राञी उशिरा घटनास्थळी भेट दिली.
राहुरी येथिल घटनास्थळी घरात जावून पोलिस महानिरीक्षक डाँ.बी.जी शेखर पाटील यांनी पहाणी केली. गोळीबार प्रकरणातील आरोपी यांनी गावठी कट्टा बनविण्याचे साहित्य स्वतःहुन काढुन दिले असल्याने त्या ठिकाणची डाँ.शेखर पाटील यांनी समक्ष पाहणी केली.घडलेल्या प्रकाराची शहानिशा केली.आरोपी यांनी गावठी कट्टा बनविण्याचे साहित्य गावठी कट्ट्यासाठी लागणारी दारु, स्प्रिंग,ड्रिल मशिन,गँस कटर आदी साहित्याची खातरजमा केली.
गोळीबाराच्या घटने नंतर शहरात खळबळ उडाली होती.याची दखल घेवून पोलिस महानिरीक्षक डाँ.शेखर पाटील यांनी राहुरी शहरात अचानक भेट दिली.त्यामुळे राहुरी शहरात पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिस महानिरीक्षक डाँ शेखर पाटील यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके,पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी,सज्जन नार्हेडा,निरज बोकील यांच्यासह मोठा पोलिस फौज फाटा घटनास्थळी तैणात होता.घटनास्थळाची प्रत्यक्ष पहाणी करुन तपासी अधिकाऱ्याकडून माहिती घेवून तपासात कोणत्याही ञुटी राहता कामा नये अशा सुचना यावेळी करण्यात आल्या.स्थानिक रहिवाशी महिलांकडून माहिती घेतली. पुर्ववैमान्यासातुन भांडणे झाली असल्याचे स्थानिकांकडून समजले.
गोळीबारात जखमी झालेल्या सोनाली बर्डे यांची तब्येत सुधारत असुन नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
गावठी कट्टा आणि राहुरी, देवळाली प्रवराचे कनेक्शन काय?
राहुरी तालुक्यात एकाच महिण्यात दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे.काञज येथिल तरुणांच्या जिवावर बेतले तर राहुरी नगरसेविका सोनाली बर्डे बालबाल बचावल्या आहेत. राहुरी गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना असल्याचे पोलिस प्रशासनास माहित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर गावठी कट्टे तयार होत असताना पोलिसांना कानोकान खबर न लागणे म्हणजे हे नवलच आहे. चंदन चोरीचे हप्ते आणायला जाणारा तो पोलिस कोण त्या पोलिसाला याची पुर्ण माहिती असताना त्याने वरीष्ठा पासुन हि माहिती लपुन का ठेवली.गावठी कट्टे विक्री करुण देणारे राहुरी व देवळाली प्रवरातील ते तरुण कोण ? गावठी कट्ट्याचे राहुरी व देवळाली प्रवराचे कनेक्शन काय आहे. हि माहिती उजेडात आल्यास देवळाली प्रवरात 400 ते 500 कट्टे व इतर शस्ञांची माहिती खरेदी विक्री व वापरणाऱ्याचां शोध लागणार आहे.
न घाबरता पोलिसात फिर्याद द्या, कठोर कारवाई करण्यात येईल;डाँशेखर पाटील
आज पर्यंत राहुरीत काय घडले हे पाहण्या पेक्षा या पुढील काळात आरोपींना पाठीशी घालुन किंवा त्यांना घाबरुन अनेक फिर्याद दाखल करत नाही.त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे फावते. अशा गुन्हेगारा विरोधात पोलिस कडक कारवाई होईल अशा प्रकारचा तपास करुन कोर्टात शिक्षा लागेल अशीच कागदपञे बनविली जातील. त्यामुळे नागरीकांनी न घाबरता फिर्याद दाखल करावी पोलिस तुमच्या बरोबर राहतील.असे पोलिस महानिरीक्षक डाँ.बी.जी.शेखर पाटील यांनी सांगितले. पोलिसांनाही यावेळी तंबी देण्यात आली.