गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराजांची प्रकाश आंबेडकरांशी बंद खोलीत चर्चा.*

*गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराजांची प्रकाश आंबेडकरांशी बंद खोलीत चर्चा.*
पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडाचे महंत ह भ प विठ्ठल महाराजांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेऊन बंद खोलीत जवळपास दोन तास चर्चा केली.
या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जाणकारांकडून लोकसभा विधानसभेत वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात परिवर्तनाच्या दिशेने भक्कम पाऊल मानलं जात असून या भेटीने विविध तर्क वितर्क लढवले जात असल्याचे ही ऐकावयास मिळाले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा.किसन चव्हाण, वंचित बहुजन आघाडी तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. विष्णू जाधव तसेच बीड जिल्ह्याचे अध्यक्ष उद्धवजी खाडे उपस्थित होते.
बीड जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की,संत वामन भाऊ यांची पुण्यतिथी दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी च्या भव्य कार्यक्रमास ऍड.श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास अगत्याने येणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती, त्याचप्रमाणे आजची भेट ही ॲड.प्रकाश आंबेडकर व गहिनाथ गडाचे महंत ह भ प विठ्ठल महाराज यांची भेट ऐतिहासिक आहे. गहिनीनाथ गडावर १८ पगड जातींच्या लोकांची श्रद्धा आहे. ही भेट जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या समन्वयाने यशस्वीरित्या पूर्ण झाली.