बकरी ईदला कुर्बानी नाही टाकळीभान मुस्लिम बांधवांचे टाकळीभान ग्रामपंचायत व ग्रामस्थांना निवेदनाद्वारे खुलासा…

बकरी ईदला कुर्बानी नाही टाकळीभान मुस्लिम बांधवांचे टाकळीभान ग्रामपंचायत व ग्रामस्थांना निवेदनाद्वारे खुलासा…
टाकळीभान :येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे.या आशयाचे निवेदन त्यांनी टाकळीभान ग्रामपंचायत दिले आहे. ते ग्रामपंचायतच्या वतीने ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे व ग्रामस्थांनी स्वीकारले. व मुस्लिम बांधवांचे आभार मानले.
मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सण व हिंदु धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने टाकळीभान गावातील मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासीक निर्णय झालेल्या बैठकित जाहीर केला. याप्रसंगी ग्रामस्थ अनिल बोडखे, मोहन रणनवरे, महेंद्र संत, पत्रकार अर्जुन राऊत, बाळासाहेब कोकणे, मुस्लिम बांधव अनिस मौलाना,भैया पठाण,बाबा सय्यद, बाबा इनामदार उपस्थित होते, निवेदनावर मौलाना अहमद, मेहबूब शेख,सलीम भैलिमकर,दिलावर पठाण,बबन सय्यद, मेहराज इनामदार, मोहम्मद शेख, अक्रम शेख ,अमिन शेख ,अहमद पठाण, हुसेन शेख, नूर पठाण आदीच्या सह्या आहेत.