नोकरी

मृत्यु हे सत्य आहे हे ध्यानात ठेवुन जिवन जगताना देशासाठी, धर्मासाठी अन कर्मासाठी जगा ह .भ. प .सोपान महाराज कन्हेरकर

मृत्यु हे सत्य आहे हे ध्यानात ठेवुन जिवन जगताना देशासाठी, धर्मासाठी अन कर्मासाठी जगा ह .भ. प .सोपान महाराज कन्हेरकर

 

 

मृत्यु हे सत्य आहे हे ध्यानात ठेवुन जिवन जगताना देशासाठी, धर्मासाठी अन कर्मासाठी जगा. जगायचच असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगणे जगा असे अवाहन ह .भ. प .सोपान महाराज कन्हेरकर यांनी केले छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने ह. भ .प. सोपान महाराज कन्हेरकर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन जे. टी. एस. हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनिष मुथा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजेश खटोड हे होते या वेळी जमलेल्या शिवप्रेमींना संबोधीत करताना ह.भ.प. कन्हेरकर महाराज म्हणाले की या देशात रहायचे असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल. वंदे मातरम म्हणावेच लागेल या देशात जन्मलेला प्रत्येक जण हिंदुच आहे .ज्ञानेश्वर माऊलीच्या स्वप्नासारखे जगा विश्व बंधुत्व ही भावना ठेवा आपण आपल्या माता पित्याचे, या मातीचे, या गावाचे ,देशाचे देणे लागतो याचे भान ठेवा .देवाने विनामूल्य दिलेल्या या देहाचा सदउपयोग करा .आत्मा व परमात्म्याचे मिलन म्हणजे राम आहे. शरीरात राम आहे तो पर्यत आपण आहोत .संस्कार व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. या दोन्ही बाजु सांभाळल्या पाहीजे. जपल्या पाहीजे .माता पित्यांची कमाई मौज मजा करण्यात उधळू नका .स्वतःतोंड गोर करण्याच्या नादात, स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या नादात आई वडीलांच्या तोंडाला काळ फासु नका. प्रेम करायच तर ते आई वडीलावर या देशावर करा .प्रेमाच्या नावाखाली सुरु असलेल्या लव्ह जिहादला बळी पडू नका .तरुणपणात अजानतेपणाने केलेली एक चुक तुमंचच काय पण तुमच्या कुटुंबाचही भविष्य बरबाद करु शकते .जागे व्हा .हिंदुंनो आपल्या कुटुंबाचा ,धर्माचा अभिमान बाळगा संभाजी महाराजांनी अनन्य साधारण यातना भोगल्या पण मोगलांना भिक घातली नाही हा देश अकबर बाबर औरंगजेब यांचा नाही तर गुरुगोविंदसिंग भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचा आहे .त्याच्या बलीदानाचा हा देश आहे धर्माबद्दल अभिमान बाळगा राष्ट्रधर्माचे, राजधर्माचे पालन करा. आपल्या आई वडीलांची सेवा करा त्यांना वृद्धाश्रमात पाठवु नका जिवंतपणी त्यांचे सरण रचु नका.पुन्हा दुसरी श्रद्धा होणार नाही याची काळजी घ्या असे अवाहनही त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी केले तर सूत्रसंचलन अभिजीत राका यांनी केले शेवटी छत्रपती तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल माळवदे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल खैरे ,रोहीत शिंदे ,स्वप्नील खैरे ,राम भोसले ,विकी माळवदे, निखील पुजारी ,किरण माळवदे ,शुभम पारखे ,आमोल मेहेत्रे , मनोज माळवदे ,ओंकार साळूंके आदिनी विशेष प्रयत्न केले .

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे