वांगी गावामध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण तसेच शिवरस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदारांना निवेदन.

वांगी गावामध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण तसेच शिवरस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदारांना निवेदन.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द वांगी बुद्रुक तसेच खिर्डी गावांना जोडलेल्या शिवरस्त्यावर जास्त प्रमाणावर अतिक्रमण झालेले असून नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे यासंदर्भात अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हा अध्यक्ष धनंजय माने यांनी श्रीरामपूर तहसीलदार पाटील यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढण्यास विनंती केली आहे माने यांनी निवेदनात म्हटले आहे की डी क्लास फॉरेस्ट गट नंबर दोन ही महाराष्ट्र शासनाची जमीन ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे जमा असून त्या जमिनीवर लागत असणाऱ्या खाजगी जमीन मालकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शासकीय जमीन कब्जात घेतलेली आहे तसेच त्याच जमिनीच्या कडेने हिंदू स्मशान भूमी कडे जाण्यासाठी मार्ग असून तिकडे जाण्यास अडचणीचा मार्ग झाला आहे ते अतिक्रमण काढण्यात यावी तसेच वांगी खुर्द व वांगी बुद्रुक गावच्या शिवरस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून काही महाभागाने रस्त्याच्या कडेला कच्चे तसेच पक्के बांधकामही केले आहे पावसाळ्यामध्ये तसेच आता सध्या शेतातील पिके बाहेर काढण्यासाठी शेती उपयोगी यांत्रिकी साधनांचा त्या रस्त्याने वापर करता येत नसून नागरिक तसेच शेतकरी यांना अडथळे निर्माण होत असल्याने वांगी खुर्द वांगी बुद्रुक खिर्डी गावच्या शिवरस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे हेही निवेदनात म्हटले आहे.
तुमच्या गावचे सर्व रस्ते खुले करून घेण्यात येतील आपल्या तक्रारीचे निश्चित निवारण करण्यात येईल अजूनही कोणत्या गावांमध्ये शेत जमीन शेत शिवार रस्त्यावर अतिक्रमण असल्यास माझ्याकडे लेखी कळवा हे रस्ते जास्तीत जास्त लवकर मोकळी करून देण्यात येतील.
तहसीलदार प्रशांत पाटील