तालुका श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात श्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले

श्रीरामपूर: तालुका श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात श्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले
*काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उर्फ वाचाळवीर यांनी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मी ठार मारू शकतो , शिव्या देऊ शकतो असे बेताल वक्तव्य केले आहे जबाबदार काँग्रेसचें पदाधिकारी असे वक्तव्य करू शकतात म्हणजे किती सत्तेचा माज या लोकांना आला आहे या असभ्य बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला तसेच त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या आणि त्यांच्या गुन्हा दाखल करून अटकेची मागणीही यावेळी करण्यात आली.*
*देशाच्या पंतप्रधान पदावर असलेल्या कोणाही व्यक्तीबाबत ही भाषा वापरणे केवळ निषेधार्हच नाही तर बेकायदेशीर आहे.*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्धच्या वक्तव्या वरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे ह्यांच्यावर under section 160 (1) Criminal Procedure Code (CrPC) नुसार केस दाखल झाली.त्यापेक्षा गंभीर स्वरुपात थेट पंतप्रधान मोदी यांनाचं ठार मारू , शिव्या देऊ असे गंभीर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर त्या कारणास्तव आस्थापनेनुसार तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली*
*याप्रसंगी उत्तर नगर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश सौदागर , महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुप्रियाताई धुमाळ , जिल्हा कार्यकारणी सदस्य मुकुंद लबडे , तालुका उपाध्यक्ष अरुण शिंदे , प्रभाकर चोरमले, आबासाहेब आताडे, शहर संयोजक विशाल अंभोरे , शहर सरचिटणीस अजित बाबेल , शहर उपाध्यक्ष विजय आखाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदन तालुका पोलीस स्टेशनचें पोलीस निरीक्षक श्री साळवे साहेब यांचें प्रतिनिधी उपनिरीक्षक श्री बोरसे साहेब यांना देण्यात आले*