अजिंक्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे लसीकरण*
अजिंक्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे लसीकरण*

*अजिंक्य इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे लसीकरण*
दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावातील अजिंक्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती बालिका दिन म्हणून
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील 15 वर्षांवरील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पढेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष वैरागड होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि पंचायत समिती श्रीरामपूर चे उपसभापती माननीय श्री बाळासाहेब तोरणे सर होते.कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाद्वारे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच आपल्या सुप्तगुणांना चालना द्यायला हवी
असे प्रतिपादन डॉ. वैरागड यानी केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी हर्षली पवार हिने केले. संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब तोरणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाईंच्या कार्याविषयी आणि जीवनाविषयी माहिती देत थोर महापुरुष आणि महान व्यक्ती या आपल्या जीवनातील आदर्श असल्याचे व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता सहावीच्या व सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या नाटीकेला प्रमुख पाहुणे यांच्याकडून रुपये 1001 चे पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे प्राचार्य श्री अन्योनी आवारे
सर यांनी सवांचे आभार मानले.
या कार्यक्रमानंतर इयत्ता नववी आणि दहावीच्या, पंधरा वर्ष वय पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली आणि लस घेण्याबाबतचे गैरसमज प्रमुख पाहुणे डॉक्टर वैरागड यांच्याकडून दूर करण्यात आले.