जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच -प्रांताधिकारी किरण पाटील सावंत

जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच -प्रांताधिकारी किरण पाटील सावंत
जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हेच अभिषेक दुधाळ याने दाखवुन दिले असुन आजच्या तरुणासमोर अभिषेक एक आदर्श असल्याचे मत उपविभागीय अधिकारी किरण सांवत पाटील यांनी व्यक्त केले .
बेलापुर येथील अभिषेक दुधाळ याने युपीएससी परिक्षेत सलग तिन वेळेस घवघवीत यश मिळवीले नुकत्याच झालेल्या परिक्षेत त्याने देशात२७८ वी रँक मिळवीली त्याबद्दल श्रीरामपुर महसुल विभागाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
उपविभागीय अधीकारी किरण सावंत पुढे म्हणाले की तरुणांनी आगोदर आपले ध्येय निश्चित करावे व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी अनेक जण प्रयत्न न करता नशिबाला दोष देतात परंतु प्रयत्नवादी रहा यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक दुधाळ असल्याचेही सावंत पाटील म्हणाले या वेळी प्रभारी तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनीही अभिषेक दुधाळ याचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी बोलताना अभिषेक दुधाळ याने मी घेतलेले कष्ट व त्याला मिळालेले आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार या सर्वांचे आशिर्वाद व प्रेम यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले या वेळी योगेश भालेकर रामेश्वर शेले सावळे भाऊसाहेब सय्यद भाऊसाहेब धनवटे भाऊसाहेब अभया राजळव शारदा वाघ मिलींद दुधाळ पत्रकार देविदास देसाई आदि मान्यवर उपस्थित होते