कत्तली करीता घेवुन जाणाऱ्या 5 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका, एकुण 5,70,000/-रु किमतीचा मुद्देमाल केला जप्त.

कत्तली करीता घेवुन जाणाऱ्या 5 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका, एकुण 5,70,000/-रु किमतीचा मुद्देमाल केला जप्त.
श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई.दिनांक 20/03/2024 रोजी 09/00 वा. चे सुमारास मा. पोनि, नितीन देशमुख साो. यांना गुप्त बातमी मिळाली की, लोणी बाजारातुन एक मिनी अशोक लेलंड गाडीमध्ये काही गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरीता श्रीरामूपरकडे घेवुन येत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख , यांनी तात्काळ तपास पथकास सदर गाडीचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथक हे संगमनेर रोडने रवाना होवुन टिळकनगर बिट चोकोसमोर संगमनेर कडुन श्रीरामपूरकडे येणाऱ्या गाड्यावर लक्ष ठेवनु उभे असताना साधारण 09/55 वा. सुमारास संगमनेरकडुन श्रीरामपूरकडे बातमीतील वर्णनाची एक मिनी अशोक लेलंड गाडी येताना दिसली. सदर गाडीला हाताने इशारा करुन व आवाज देवुन थांबवण्यास सांगितले असता सदर चालकाने गाडी थांबवली. सदर गाडीच्या चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव नियाज अहमद फकीरमहमद शेख, वय 40 वर्षे, रा. गोसिया मस्जिद परसिर, वार्ड नं. 02, श्रीरामपूर असे सांगितले. त्यांस सदर गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिली तेव्हा पंचासमक्ष त्याच्या गाडीची झडती घेतली असत्ता कत्तली करीता आणलेले खालील वर्णनाचे गोवंशीय जनावरे मिळुन आले
1) 80,000/ रु.कि.ची एक गोवंशीय जातीची काळया रंगाची एक जर्सी गाय रु.कि अं.2)70,000/ रु. किं. चो एक गोवंशीय जातीची काळया पांढऱ्या रंगाची एक जर्सी गाय रु.कि.अं. 3)65,000/ रु. किं.ची एक गोवंशीय जातीचे काळया पांढऱ्या रंगाचे एक जर्सी गाय रु.किं.अं.4)30,000/- रु. किं.ची एक गोवंशीय जातीचे काळया पांढऱ्या रंगाचे एक जर्सी कालवड रु.किं.अं. 5)25,000/- रु. किं.ची एक गोवंशीय जातीचे काळया पांढऱ्या रंगाचे एक जर्सी कालवड रु. कि. अं. 6)3,00,000/- रु. किं.ची एक मिनी अशोक लेलंड गाडी क्रं. MH-14.GU-1353 अशी असलेली जुवाकिंअ. असा एकूण 5,70,000/- रु एकुण किंमतीचा मुद्देमला जप्त करण्यात आला.
विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. 331/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5. 5(अ) (1), 5 (ब), सह महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (च) (छ) (ज) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबमें तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडोल तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ / शफिक शेख, पोना/ आर.ओ. कारखेले, पोना/किशोर औताडे, पोका / राहुल नरवडे, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/ कुलदिप पर्वत यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो यांचे मार्गदर्शनाखाली पोना /किशोर ओताडे हे करीत आहेत.