अल्पवयीन मुलीची छेडछाड चांद्यातील तीन रोड रोमिओ वर सोनईत गुन्हा दाखल….

अल्पवयीन मुलीची छेडछाड चांद्यातील तीन रोड रोमिओ वर सोनईत गुन्हा दाखल….
नेवासा तालुक्यातील चांदा येथे एका अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी चांदा येथील तीन युवकावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की दिनांक १ ऑगस्ट रोजी चांदा येथील फिर्यादी ही सुमारे दोन महिन्यापासून जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथे शाळेत सायकलने येत असताना सागर कारभारी कापसे, पवन राजेंद्र दहातोंडे, जगदीश बाळासाहेब बोधक सर्व राहणार चांदा हे नेहमी आपल्या मोटार सायकल वरून तिचा पाठलाग करत होत त्यातच त्यांनी दिनांक एक रोजी जगदीश बोधक याने प्रपोज केले असता त्याला फिर्यादीने नकार दिला दिनांक ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सरकारी दवाखाना चांदा जवळ फिर्यादी सायकलने घरी जात असताना यातील आरोपीने पल्सर मोटरसायकलवर येऊन तिच्या सायकलला मोटर सायकल आडवी लावली व जगदीश बाळासाहेब बोधक याने तिला की हे लेटर घे आणि संबंधित त्याला दे तू जर हे केले नाहीस तर तुला मारीन असा दम दिला फिर्यादीस हे देत असताना मोटर वरसायकल ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला फिर्यादी हिने आरडा ओरड केल्याने तिचा भाऊ पळत येऊन बोलला असता बोधक यांने त्यास धक्का देऊन पळून गेली वरील फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चांदा येथे जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनीची ज्या ठिकाणाहून वर्दळ असते त्याच ठिकाणी अवैद्य धंदे चालतात त्यामुळे विद्यार्थ्याने काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे रोड रोमिओ मुळे विद्यार्थी दररोजच्या त्रासाला कंटाळले आहेत शाळेच्या आवारात रोड रोमिओ हे सुसाट वेगाने गाड्या चालवत असतात त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघातही झाले आहेत मात्र विद्यालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे पोलीस प्रशासनाला याबाबत दूरध्वनी करून संपर्क केला असता आपण त्या ठिकाणी कारवाई करू मात्र यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही वरील घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे चांदेकरांनी वरील आरोपीची गावातुन धिड काढून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे आरोपीवर कायदेशीर कारवाई न झाल्यास नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत