वांगी बुद्रुक गावात जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिम. अखेर तरुणांच्या प्रयत्नाला यश.

वांगी बुद्रुक गावात जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिम. अखेर तरुणांच्या प्रयत्नाला यश.
आज वांगी बुद्रुक गावात जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिम मिळाली , आज सायंकाळी ठीक 4 वाजता गावच्या वरद गणपती (गणेशखिंड) मंदिराच्या परिसरात असलेले रूम मध्ये जिम उतरविण्यात आली असून गावचे तरुण युवक खूप आनंदी आहेत.
तसेच गावातील ग्रामपंचायत अंतर्गत पाठपुरावा करून श्रीरामपूरचे लाडके आमदार मा.श्री लहू कानडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून ही जिम क्रीडा विभाग अहमदनगर येथून मंजूर करण्यात आली आहे, त्याबद्दल गणेशखिंड परीसरातील आणि समस्त वांगी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी श्री धनंजय भाऊ माने,श्री बबन दादा आहेर यांच्या हस्ते जिम घेऊन येणाऱ्या वाहन चालक आणि सहायक यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच माननीय आमदार साहेब यांचे प्रतिनिधी स्वरूपात श्री धनंजय भाऊ माने आणि वांगी गावचे प्रतिनिधी स्वरूपात श्री बबन दादा आहेर यांचा गणेशखिंड वांगी येथील युवकानंतर्फे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वांगी गावचे श्री धनंजय भाऊ माने, श्री बबन दादा आहेर, श्री दिलीप पवार, श्री नामदेव थोरात, योगेश शेळके, सोमनाथ मोटे, रामभाऊ खेमनर, बाबासाहेब हळनोर,योगेश कांबळे, किशोर पारखे, कृष्णा हळनोर, सतीश चितळकर, पवन खेमनर, गणेश पारखे , संदीप ठाकर, योगेश मोटे,संदीप खेमनर, विकास शेळके,कार्तिक खेमनर ,राहुल कांबळे,नितीन कांबळे, जयराम ठाकर, शुभम नरवडे,बबलू खेमनर,यश साळवे,अस्लम कुरेशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.