१ ९ जणांना ६८ लाख ४१ हजारांनी तिघांनी मिळून गंडविल्याची तक्रार

१ ९ जणांना ६८ लाख ४१ हजारांनी तिघांनी मिळून गंडविल्याची तक्रार
किराणा व्यवसायाकरिता फ्रेंचाईजीच्या नावाखाली अनेकांची लाखोंनी फसवणूक झाल्याची फिर्याद तोफखाना पोलिस ठाण्यात ( दि . २० ) दाखल करण्यात आली असून , १ ९ जणांना ६८ लाख ४१ हजारांनी तिघांनी मिळून गंडविल्याची तक्रार कुणाल भगत ( रा . बुऱ्हाणनगर , ता.जि.नगर ) यांनी दिली आहे . कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत आहेत .यामध्ये कमी पैसे गुंतवून जास्त पैसे मिळवण्याच्या , तसेच कंपन्यांच्या फ्रेंचाईजी देण्याच्या नावाखाली लाखोंनी गंडविल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत . तशीच एक घटना नगर तालुक्यात घडली आहे . एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार कुणाल भगत यांनी दिली असून , किराणा माल फ्रँचाईजीच्या नाव खाली १ ९ जणांना तिघांनी मिळून ६८ लाखांनी गंडविले . ऑगस्ट २०२० मध्ये सोशल मीडियावर ग्रोसरी मार्केट व रिटेल ग्रोसरी मार्केटसाठी बी.के. ब्रँडसाठी फ्रँचाईजीसाठी एक जाहिरात प्रसिध्द करण्यात आली . जाहिरात वाचून फ्रेंचाईजी देणाऱ्या हर्षल ठाकरे यांच्याकडून व्यवसायासंबंधित सखोल माहिती घेवून व्यवसायात पैसे गुंतविण्याचा निर्णय फिर्यादीने घेतला . ज्योती हर्षल ठाकरे यांच्याकडे २३ ऑक्टोबर २०२० रोजी करारनामा करून आठ लाख ६० हजार आरटीजीएस व एक लाख ४० हजार रोख तक्रारदारांनी दिले .त्यानंतर करारनाम्यानुसार भिस्तबाग चौक , सावेडी रोड येथे फिर्यादीने दुकान सुरू केले .तीन महिने दुकान चालविल्यानंर ३५,हजारप्रमाणे नफा मिळाल्यानंतर कोरोनामुळे काही महिने दुकान बंद राहिले . यानंतर हर्षल ठाकरे व ज्योती ठाकरे यांनी पैसे देणे बंद केले . आप सी समझोता करण्याचे ठरल्यानंतर आयडीएफसी बँकेचे तीन चेक दिले ; मात्र तिन्ही चेक अंकाउंटला वटले नसल्याने व नवनागापूर येथे असलेल्या ऑफिसला गेल्यानंतर ऑफिस बंद आढळल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.