गुन्हेगारी

वाळूमाफियाची गुंडागर्दी, हायवातील वाळू रस्त्यात पलटी केल्याने कलेक्टर मॅडमची गाडी फसली ! पाठलाग करणाऱ्या अंगरक्षकाला ३ किलोमीटर फिल्मी स्टाईल फरपटत नेले.

 वाळूमाफियाची गुंडागर्दी, हायवातील वाळू रस्त्यात पलटी केल्याने कलेक्टर मॅडमची गाडी फसली ! पाठलाग करणाऱ्या अंगरक्षकाला ३ किलोमीटर फिल्मी स्टाईल फरपटत नेले.

 

बीडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी या शासकीय काम आटोपून मुंबईहून छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर उतरल्या. तेथून त्या त्यांच्या शासकीय गाडीने बीडकडे निघाल्या. रस्त्यात एक विना क्रमांकाचा हायवा दिसला. त्याचा पाठलाग सुरु झाला. त्याला थांबण्याचा इशारा केला मात्र त्याने हायवा न थांबवता तो तसाच जोराने दामटला. पाठशिवणीचा हा खेळ सुरु झाला. दरम्यान, मादळमोही जवळ त्याने हायवातील वाळू रस्त्याच्या मधोमध पलटी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांची गाडी त्या वाळूत फसली. याचवेळी पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांनी कलेक्टर मॅडमच्या गाडीतून उतरून स्पिड कमी असलेल्या हायवाला पकडले. मात्र, या हायवा चालकाने तो न थांबता तसाच दामटला. ज्या बाजूने पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे हे हायवाला लटकले होते त्या बाजुने हायवा चालकाने एका बाभळीच्या झाडाशेजारून हायवा घेतल्याने पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांच्या हाताला बाभळीचे काटे लागले आणि ते खाली पडले. तब्बल ३ किलोमीटर त्याने फरपटत नेले. या घटनेत पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे हे जखमी झाले.

अंबादास सुरेश तावणे (वय 33 वर्ष, व्ययवसाय नोकरी, पोशि/ 2070 नेणमुक आर. सी. पी. बीड रा. माऊली नगर बीड) हे सध्या जिल्हादंडाधिकारी बीड यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून अंगरक्षक म्हणुन नेमणुकीस आहे. पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 24.05.2023 रोजी बीडच्या जिल्हादंडाधिकारी यांची मुंबई येथे बैठक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट येथे सोडण्यासाठी पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे व सोबत शासकिय वाहन चालक सुनिल रामभाऊ मस्के सकाळी 04.45 वाजता रवाना झाले.

छत्रपती संभाजीनगर एअर पोर्टवर सकाळी 06.30 वाजता पोहचलो. त्यांनंतर जिल्हादंडाधिकारी मॅडम सकाळी 07.00 वाजेच्या फ्लाईटने मुंबईसाठी रवाना झाल्या. दिनांक 25.05.2023 रोजी 01.45 वाजता जिल्हादंडाधिकारी मॅडम छत्रपी संभाजीनगर रेल्वेस्थानकावर आल्याने त्यांना घेऊन बीडसाठी रवाना झाले. छत्रपती संभाजीनगरहून बीडला येत असतांना वेळ 03:12 ते 3:16 वाजेच्या सुमारास गडीजवळ एक हायवा वाळूने भरलेला पिवळया रंगाचा त्याच्या पाठीमागे गाडीचा नंबर टाकलेला नव्हता. तो शासकिय वाहनाच्या समोर दिसल्याने त्यास जिल्हादंडाधिकारी बीड यांनी थांबविण्यास सांगितले.

त्यानुसार पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांनी व शासकिय वाहन चालक सुनील मस्के यांनी गाडीचा काच खाली घेऊन त्यास थांबविण्याचा इशारा केला परंतू तो थांबत नसल्याने जिल्हादंडाधिकारी यांनी आपली गाडी त्याच्या गाडीच्या समोर घ्या असे सांगितले. तेंव्हा चालकाने जिल्हाधिकारी यांची गाडी हायवासमोर घेतली असता, त्याने हायवाची स्पिड कमी करण्या ऐवजी जास्त वाढवल्याने जिल्हादंडाधिकारी यांनी आपले वाहन बाजूला घ्या असे सांगितल्याने चालकाने वाहन बाजुने घेत त्याचा पाठलाग सूरू ठेवला.

मादळमोहीकडे जाणारा ब्रिज आल्यावर त्या वाळुने भरलेला हायवा ब्रिज खालून वळल्याने जिल्हादंडाधिकारी यांनी त्यांची गाडीने परत त्याचा पाठलाग सुरु केला. ब्रिजपासुन तो हायवा मादळमोहीच्या जवळ आल्यानंतर मादळमोहीच्या अलीकडे डाव्या बाजुने वळला. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी यांची गाडी सुध्दा हायवाच्या पाठीमागे घेतले. मादळमोही आलीकडे वळालेल्या ठिकाणापासून अंदाजे 01 कि.मी. अंतरावर लहान पुलाच्या जवळ त्याने त्याच्या हायवा मधील वाळु रस्त्याच्या मधो मध पलटी केली. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी पाठलाग करत असलेली शासकीय गाडी त्या वाळुच्या ढिगाऱ्यापासून पुढे जात असतांना वाळुच्या ढिगाऱ्यावर फसून बसली.

तेवढ्यात पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांनी शासकीय गाडीचा दरवाजा उघडून त्या हायवाची स्पीड कमी असल्याने हायवाच्या ड्रायव्हर बाजुने पाठीमागे पळत जाऊन समोरील आरशाच्या अँगलला उजव्या हाताने पकडले. एक पाय ठेऊन बाजुने ते वर चढले. त्यावेळी पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांनी हायवाचालकाला गाडी थांबवण्याचे सांगितले. परंतू तो “म्हणाला साहेब खाली उतरा नाही तर तुमच्या बाजुने बाभळीच्या झाडावर तुम्हाला आदळतो. त्यानंतर त्याने हायवाची स्पिड वाढवून हायवा जोरात पळवू लागला. त्यावेळी तो कोणालातरी त्याच्या मोबाईलवर बोलत होता. हायवावर लटकून असलेल्या पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांच्या बाजुने समोरुन बाभळीच्या झाडाचे काटे लागल्याने

पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे हे खाली पडले. त्यावेळी पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे हे वाळुच्या ढिगाऱ्यापासून अंदाजे 03 कि.मी. लांब आले होते. नंतर वाळुचा हायवा ईटकुर मार्गे पुढे गेला. त्यानंतर पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे हे वाळुच्या ढिगाऱ्याजवळ आले व झालेला प्रकार जिल्हादंडाधिकारी मॅडम व वाहन चालक सुनील मस्के यांना सांगितला. त्यावर जिल्हादंडाधिकारी बीड यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांना माहिती दिली. त्यानंतर रात्री 03.24 ते 03.30 वाजेच्या दरम्याण गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आले. त्यांच्या मदतीने जिल्हादंडाधिकारी बीड यांचे वाहन ट्रॅक्टर लावून काढण्यात आले. त्यानंतर गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने 04.30 वाजेपर्यंत हायवाचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही.

याप्रकरणी पोलिस शिपाई तथा जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक अंबादास तावणे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी हायवाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे