एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळून जात असलेल्या

एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळून जात असलेल्या
राहुरी येथील अराध्य दैवत खंडोबा मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या माळी गल्लीतील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळून जात असलेल्या औरंगाबाद येथील महिला आरोपीस यात्रेत पेट्रोलिंग करिता असलेल्या पोलिसांनी जागेच पकडून चोरलेले 45000 रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे मनी मंगळसूत्र हस्तगत केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राहुरी शहरातील माळीगल्ली येथील वैशाली रवींद्र ठोकळे ह्या त्यांच्या पतीसोबत राहुरी येथील खंडोबा मंदिरात १८ एप्रिल रोजी सायंकाळी रांगेत उभे राहून दर्शन घेत असताना उषा संजू काळे (वय 24 वर्षे राहणार बावशिगपुरा जिल्हा औरंगाबाद) हि ठोकळे यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र बळजबरीने तोडून पळ काढत असताना यात्रेत पेट्रोलिंग करित असलेले पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे, पोलीस नाईक अमित राठोड, महिला पोलीस नाईक स्वाती कोळेकर, पोलीस नाईक सचिन लोंढे यांनी महिला आरोपीस जागीच पकडून तिच्याकडून 45, 000 रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे मनी मंगळसूत्र त्यामध्ये काळी मनी असलेले हस्तगत केले. वैशाली ठोकळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
तसेच सदर महिला आरोपी उषा काळे र्हास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, राहुरी कोर्ट यांच्या पूर्वपरवानगीने वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात 23.50 वाजता हजर केले. तिला सर्वोच्च न्यायालयाचे डी. के .बसु विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य व शीला बारसे विरुद्ध महाराष्ट्र शासन यांचे तत्त्वाचे पालन करून 01.09 वाजता अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे.