गुन्हेगारी

जिहादी प्रवृत्ती च्या लोकांनी गौरक्षकवर जीवघेणा हल्ला अवैद्य कत्तलखान्यावर कारवाई कधी होणार- सागर भैया बेग 

जिहादी प्रवृत्तीच्या लोकांचा गौरक्षकवर जीवघेणा हल्ला अवैद्य कत्तलखान्यावर कारवाई कधी होणार- सागर भैया बेग 

 

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जनतेचे रक्षण करते पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले.

श्रीरामपूर तालुक्यात जास्त करून शहरी भागात मोठ्या प्रमाणावर अवैध्य कत्तलखाने चालू असून हिंदूंच्या भावना दुखावण्यात येतील या उद्देशाने हिंदू धर्मीयांची गोमाता त्यात गावरान गाय यांची जिहादी प्रवृत्तीच्या कसायांकडून मोठ्या प्रमाणावर गोवंशीय कत्तली होत असल्याने गौरक्षक हे कायम तत्पर असतात. त्यातच नुकती झालेली घटना म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी शहरांमधून कत्तलीसाठी गाई घेऊन जाणाऱ्या गाडीला गोरक्षकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिल्याचा राग मनात धरून चक्क पोलीस स्टेशन आवारामध्ये घुसून जीहादी प्रवृत्तीच्या लोकांनी गोरक्षकांवर जीव घेणा हल्ला केल्याने काही काळ वातावरण गंभीर बनले होते.

गोरक्षकांवर हल्ला करण्यात आलेल्या हल्लेखोरांनी चक्क पोलीस स्टेशनमध्ये गोवंश वाहतूक करणाऱ्या गाडीमधून गाई उतरून घेऊन गेल्याचे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असल्याने पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलची भावना वेगळ्या स्वरूपाची दिसून येत आहे.

यावर पोलीस स्टेशन कठोर कारवाई करणार का?  कारवाई नुसती कागदावर राहिल्याने जिहादी प्रवृत्तीच्या कसयांनी हा हल्ला केल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे  यांच्यावर कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवतील असा इशारा यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांनी दिला.

3/5 - (2 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे