संशयास्पदरित्या फिरताना आढळलेल्या दोन मुलांना ग्रामस्थांनी पकडून पोलीसांच्या केले स्वाधीन

संशयास्पदरित्या फिरताना आढळलेल्या दोन मुलांना ग्रामस्थांनी पकडून पोलीसांच्या केले स्वाधीन
बेलापुरगावात काल दोन अल्पवयीन मुले संशयास्पद रितीने फिरताना आढळून आली असुन. ते शेळी चोरण्याच्या उद्देशाने आले असावेत अशी ग्रामस्थांना शंका आहे. त्या दोघांनाही बेलापुर पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून गावातून शेळ्या चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते.विजय शेलार, बंटी शेलार,नब्बु शेख, यांच्या शेळ्या काही दिवसापूर्वी चोरीस गेल्या होत्या. त्या बाबत विजय शेलार व इतर सहा जणांनी शेळ्या चोरी झाल्याची तक्रार बेलापुर पोलीस स्टेशनला सन २०२१ ला दिलेली होती.त्यात विजया शेलार यांची एक शेळी, सिराज कुरेशी यांची एक शेळी ,निसार सय्यद यांची एक शेळी, नवाब शेख यांची एक शेळी, फरहान शेख यांच्या दोन शेळ्या, चोरीस गेलेल्या असलेबाबत तक्रार देण्यात आली होती. त्या बाबत कुठलाही तपास लागलेला नाही.असे असतानाच काल दुपारी वडाळा महादेव येथील दोन अल्पवयीन मुले शेलारवाडा परिसरात संशयीतरित्या फिरताना आढळून आले. त्या दोन अल्पवयीन मुलाकंडे बिगर नंबरची मोटार सायकल होती. सदर मुले विनाकारण फिरत असल्याचा ग्रामस्थांना संशय आला. आदित्य शेलार,सुयश शेलार,आतिष शेलार, योगेश गायकवाड, नदीम शेख, निशीकांत शेलार,संकेत शेलार, यांनी त्यांना हटकले असता ते पळु लागले. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय आणखी बळावला. त्यांनी दोघांनाही पकडून बेलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले असुन पोलीस अधिक तपास करत आहेत