तिळापुर सरपंच पदी कावेरी जाधव यांची बिनविरोध निवड

तिळापुर सरपंच पदी कावेरी जाधव यांची बिनविरोध निवड
राहुरी तालुक्यातील तुळजापूर ग्रामपंचायत तीन वर्षापूर्वी निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी सरपंच उपसरपंच पदे काही दिवसांसाठी ठरवून घेतले होते. त्यानुसार टर्म आल्याने सुशिक्षित सदस्य सौ कावेरी संदीप जाधव यांच्या नावाची चर्चा सरपंच पदासाठी चालू होती.
सरपंच बापूसाहेब आघाव यांनी त्यांच्या कालावधी संपल्याने सरपंच पद हे रिक्त होते. आज 7 फेब्रुवारी रोजी सरपंच निवड प्रक्रियेची सर्कुलर आले. त्यानुसार आज सकाळी प्रशासकीय निवडणूक अधिकारी म्हणून, मंडल अधिकारी सौ आघाव व तलाठी सौ सोनवणे मॅडम यांनी काम पाहिले. सरपंच पदासाठी एकमेव सौ कावेरी संदीप जाधव यांचा फॉर्म आल्याने दिलेल्या वेळेत दुसरा अर्ज आला नसल्याकारणाने एकमताने सरपंच म्हणून सौ कावेरी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मंडलाधिकारी सौ आघाव तलाठी सौ सोनवणे पोलीस नाईक अमित राठोड व तिळापुर ग्रामस्थ उपस्थित होते