आरोग्य व शिक्षण
ग्रामपंचायत मार्फत डास निर्मूलन फवारणी

ग्रामपंचायत मार्फत डास निर्मूलन फवारणी सुरु करण्यात आली असून प्रभाग क्रमांक ४ मधून फवारणीचा शुभारंभ करण्यात आला.
डास निर्मूलन फवारणी तीन ते चार दिवसात पुर्ण करण्यात येणार असून ग्रामपंचायतचे २ स्वच्छता कर्मचारी व रोजंदारीचे मंजूर लावून स्वच्छता मोहीम सुरु करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत मार्फत जेसीबीच्या साह्याने प्रभाग क्रमांक १ ते ६ मधील रस्त्यालगतचे उकिरडे – झाडे – झुडपे काढून स्वच्छता
करण्यात येणार आहे त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होईल असे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, प्रा.जयकर , दिगंबर मगर, साळवे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल त्रिभुवन, अशोक कचे, मोहन रणनवरे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक बनकर, टिलू परदेशी भारत पवार आदी उपस्थित होते.