बेलवंडी पोलिसांनी कॉम्बिग ऑपरेशन करताना चोरीच्या दुचाकी पकडल्या….

बेलवंडी पोलिसांनी कॉम्बिग ऑपरेशन करताना चोरीच्या दुचाकी पकडल्या पण….
पोलीस अधिक्षक मनोज पाटील , .अप्पर पोलीस अधिक्षक .सौरभ अगरवाल , उप.विभागीय पोलीस अधिकारी .आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी कोम्बिंग ऑपरेशन करुन रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी पकडणे बाबत विशेष मोहिम चालू असून सदर मोहिमेचे अनुषंगाने बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक . नंदकुमार दुधाळ हे अवैध धंदया बाबत माहिती घेत असताना गुप्त माहिती मिळाल्याने तात्काळ नाकाबंदी नेमून पोलिस नाईक सोनवणे पोलिस नाईक शरद गांगर्डे पोलिस कॉन्स्टेबल पठारे नाकाबंदी व कोंम्बिग ऑपरेशन दरम्यान नाकाबंदी चालू असताना बजाज कंपनीची प्लसर मोटार सायकल नंबर एच १२ एम.टी. ७३९७,हिरो कंपनी स्पेलडर मोटारसायकल नंबर आर.जे.०९ एन.एस ७५१७,होंडा कंपनीची कंपनीची मोटारसायकल नंबर एम.एच १२ क्यु.ओ.५५४३ असे नाकाबंदी करत असताना आरोपी यांनी सदरचे मोटार सायकल टाकून पळून गेले आरोपीचा शोध घेतला परंतू ते मिळून आलेले नाही तपास चालू आहे.सदर मोटार सायकल ही निगडी पोलीस ठाणे,कोंढवा पोलीस ठाणे जिल्हा पुणे येथील पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. सदर मोटार सायकल यांचे मालकाचा शोध घेऊन संबधीत पोलीस स्टेशला संपर्क करुन त्यांचे ताब्यात देण्याची तजविज ठेवलेली आहे.सदर कोबिंग ऑपरेशन नाकाबंदी दरम्यान सुमारे
अंदाजे १,५०,००० रुपयाचे किंमतीचे चोरीस गेलेल्या मोटार सायकल हस्तगत केलेल्या आहेत.
अशी माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली आहे.
चोरी गेलेल्या मोटार सायकल कॉम्बिग ऑपरेशन करताना बेलवंडी पोलिसांनी पकडल्या खऱ्या परंतु पोलिसांच्या समोरून मोटारसायकल चोर पळून गेले,याचीच चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.