सोनई परिसरात 14 कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.

सोनई परिसराचा विकासकामांना गती.ना शंकरराव गडाख.
सोनई परिसरात 14 कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न.
सोनई व परिसरातील सोनई ते मोरयाचिंचोरे (तालुका हद्द) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 9 कोटी 80 लक्ष रुपये, सोनई- मोरयाचिंचोरे रस्ता ते लोहोगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 2 कोटी 40 लक्ष रुपये,सोनई-शनीशिंगणापूर रस्ता ते खरवंडी चौक रस्ता (हलवाई गल्ली) कॉक्रीटीकरण व डांबरीकरण कामासाठी 80 लक्ष रुपये,
सय्यद सॉमिल ते कुसळकर वस्ती रस्ता खडीकरण कामासाठी 14 लक्ष रुपये,सोनई दशक्रियाविधी घाट ते स्वामी विवेकानंद चौक रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी 88 लक्ष रुपये अशा एकुण 24 कोटि रुपये खर्चाच्या सोनई व परिसरातील नागरिकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन ना शंकरराव गडाख यांच्या हस्ते व सुनीलराव गडाख सभापती अर्थ व पशुसंवर्धन जि प अनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत रवी दि 27 फेब्रु 2022 रोजी संपन्न झाले याप्रसंगी बोलतांना ना शंकरराव गडाख म्हणाले सोनईसह परिसराने राजकीय वाटचालतीत नेहमी एकसंघपणे साथ दिलेली आहे मंत्रिपदाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह सोनई परिसराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे यात सर्वांनी साथ द्यावी.
एकाच वेळी 14 कोटी रुपये कींमातीच्या विकासकामांचे भूमिपूजन केले आहे लवकरच या कामांना सुरुवात होईल कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.व सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार आहे असे ना गडाख म्हणाले सोनईसह परीसरात रास्ता कामे मार्गी लागल्याने सोनई,लोहोगाव, मोरयाचिंचोरे,धनगरवाडी, या परिसरातील शालेय विद्यार्थी, शेतकरी,व्यवसायिक यांना दळणवळण करणे सुलभ होणार आहे.खरवंडी चौक सोनई, स्वामी विवेकानंद चौक व सोनई बस स्टँड या तिन्ही ठिकाणांचे भूमिपूजन ना शंकरराव गडाख यांनी पायी जात केले व भूमिपूजन प्रसंगी सोनई व्यापारी पेठेतील नागरिक व परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांची जागेवरच सोडवणूक केली.
सदर कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने व लवकरात लवकर करण्याबाबत संबंधितास सूचना दिल्या.
याप्रसंगी सुनीलराव गडाख सभापती अर्थ व पशुसंवर्धन,धनंजय वाघ सरपंच सोनई,प्रसाद हारकाळे उपसरपंच सोनई,आदींसह सोनई,लोहोगाव,धनगरवाडी,
मोरयाचिंचोरे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोनई ता नेवासा येथील विकासकामांचे भूमिपूजन करतांना ना शंकरराव गडाख ,सुनीलराव गडाख सभापती व उपस्थित ग्रामस्थ.