भाजपा पक्ष संघटना ही मजबुत होती,आहे आणि भविष्यातही राहणार

भाजपा पक्ष संघटना ही मजबुत होती,आहे आणि भविष्यातही राहणार
भाजपातुन नुकताच अमोल भनगडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्याने राहुरी तालुका भाजपावर काहीच परिणाम होणार नसुन तालुक्यातील भाजपा पक्ष संघटना ही मजबुत होती,आहे आणि भविष्यातही राहणार आहे. संधी साधुंच्या येण्या-जाण्यामुळे पक्षावर कोणताही फरक होत नाही. पक्ष विचारांची बाधिलकी आणि पक्ष निष्ठावंतांमुळे भाजपा हा जगातील एक नंबर पक्ष आहे. अनेक जण पक्षामुळे मोठे होतात परंतु आल्यामुळेच पक्ष आहे या भ्रमात ते राहतात.
पाच-सातशे मतदार असलेल्या छोट्याशा गावा बाहेर ओळख नसलेल्या अमोल भनगडे यांना भाजपाने तालुकाभर ओळख मिळवून दिली.जि.प.निवडणूकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती, या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष पदही त्यांना देण्यात आले परंतु ते पक्षाशी कधीच प्रामाणिक नव्हते. त्यांचा राजकीय इतिहास हा दलबदलुपणाचा आहे. स्वार्थी अतिमहत्वकांक्षी वृत्ती, संकुचित विचार सरणीमुळे ते कुठेही प्रामाणिक राहुच शकत नाहीत त्यामुळे ते पक्षात असुन देखील पक्ष संघटने पासुन दुर एकाकी होते, भाजपा तालुकाध्यक्ष असतांनाही त्यांच्याबरोबर भाजपाच्या एकाही पदाधिकाऱ्याने भाजपा पक्ष सोडला नाही ,पक्षांतर केले नाही यावरुन त्यांची भाजपात किती पत होती? हे लक्षात येते. त्यांच्या स्वार्थी राजकारणाबाबत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनभिज्ञ नाहीत त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असल्यामुळेच त्यांना एकट्यानेच मुंबईला जावुन प्रवेश करावा लागलेला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात केलेल्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीत असंतोषाचे तर भाजपात आनंदाचे वातावरण आहे.यावेळी राजेंद्र गोपाळे उपाध्यक्ष भाजपा राहुरी तालुका,विक्रम तांबे, सुकुमार पवार,प्रा. संजय तमनर सर, सुभाषराव गायकवाड,प्रा. चांगदेव भोंगळ सर, राजेंद्र दरक, प्रकाश शेठ पारख, विजयराव बनकर, संदीप गीते, सचिन मेहत्रे, काशिनाथ खुळे, अरुण धामोरे, अविनाश बाचकर, सर्जेराव घाडगे, प्रा. साहेबराव तोडमल सर, संतोष खुळे, लक्ष्मण तनपुरे, नानासाहेब गागरे, कैलास पाटील पवार, श्याम भिंगारदे, प्रमोद गांधले,उदय मूथा.या वेळी सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थीत होते.