टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या वतीने चप्पलचे वाटप…

टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या वतीने चप्पलचे वाटप…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना श्रीरामपूर पंचायत समितीच्या मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी स्वखर्चातून येथील 105 विद्यार्थ्यांना पावसाळ्यात हाल होऊ नये म्हणून चप्पल चे वाटप करण्यात आले. लक्ष्मीवाडी परिसरामध्ये मजूर ,कामगार, आदिवासी, गरीब कुटुंबातील मुलांची संख्या जास्त असल्याने येथील मुलांचे आरोग्य चांगले रहावे व विंचू ,काटा व पावसाळ्यामध्ये मुलांचे अनवाणी पायामुळे हाल होऊ नये या जाणिवेतून त्यांची सोय व्हावी व त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलावा या हेतूने त्यांनी येथील विद्यार्थ्यांना पादत्राणांचे वाटप केले. याप्रसंगी त्या बोलताना म्हणाल्या की आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. व गरजवंत विद्यार्थ्यांना गरज असेल त्या ठिकाणी दान केल्याने दानाचे सार होते. यातून समानतेची वागणूक जोपासली जाऊन सर्वांना सोबत बरोबर घेऊन प्रगती करावी हा उद्देश आहे. असे त्या म्हणाल्या. यावेळी राजेंद्र कोकणे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचे ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.कार्लस साठे सर होते.शिक्षिका मनीषा कडू यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा याप्रसंगी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी आबासाहेब रणनवरे,अर्जुन राऊत, दिगंबर मगर, शाळा व्यवस्थापन समितीचे सोमनाथ रणनवरे, संदीप जाधव, बापूसाहेब साळवे, धर्माजी रणनवरे ,खेडकर मॅडम, कल्पना कोकणे, आदींसह ग्रामस्थ व शाळेचे पालक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती पटारे यांनी केले. तर आभार नामदेव भालदंड यांनी मानले.